veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | । युट्युब
रिपाई आठवले पक्षाचे तहसीलदार मार्फत राष्ट्रपती मोहदय यांना निवेदन
धामणगाव रेल्वे ता.प्रतिनीधी :- बुद्धगया येथील महाबोधी महाविहार १९४९ च्या व्यवस्थापन ॶॅक्ट मध्ये दुरुस्ती करून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या सर्व मागण्या मंजूर करण्यात याव्यात.
या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने प्रशांत मुन अमरावती जिल्हा संघटक रिपाई आठवले यांच्या नेतृत्वात मा.तहशीलदार धामणगाव रेल्वे मार्फत राष्ट्रपती मोहदय यांना पाठविण्यात आले .
जगासह देशभरातील संपूर्ण बौद्ध बांधवांच्या भावनेचा विचार व आदर करुन १९४९ च्या ॶॅक्ट मध्ये दुरुस्ती करून बिहार राज्यातिल बौद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यात यावे. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देतानां जिल्हा संघटक रिपाई आठवले चे प्रशांत मुन.रवि उर्फ दादू मेश्राम. प्रेम मोटघरे.राजिक बेग. सौ.वनिता नाईक.अल्पेश बनसोड.दिनेश बोबडे. राजेंद्र भरोसे. कोहिनूर श्रीरामे. संदिप रामटेके राजू सावध श्याम ऊर्फ बाळासाहेब तुपसुंदरे अक्षय अर्जुने अशोक संसारे सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.