पुणे : मनीभाई मानव सेवा ट्रस्ट पुणे तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार 2025
मा. जिल्हा परिषद सदस्य श्री. अशोक गोविंदराव धनजोडे यांना प्रदान करण्यात आला.
दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजी पुणे येथे पार पडलेल्या भव्य सन्मान सोहळ्यात
माननीय खासदार सौ. मेधाताई विश्राम कुलकर्णी यांच्या शुभहस्ते धनजोडे यांचा सत्कार करण्यात आला.
सामाजिक कार्यातील सातत्य, सर्वसामान्य नागरिकांसाठीची धडपड, समाजातील वंचित घटकांना दिलासा देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत हा मानाचा गौरव करण्यात आल्याचे आयोजक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यानिमित्ताने धनजोडे यांनी समाजाची सेवा हीच खरी पूजा असल्याचे सांगून, पुढेही अधिक जोमाने लोकसेवा करण्याचा संकल्प व्यक्त केला.
या सन्मानानंतर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून राजकीय-सामाजिक क्षेत्रातून धनजोडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.















