पिंपळखुटा येथील श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय येथे नेत्तृत्व विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुणांचा विकास करणे व त्यांना व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात सक्षम बनवणे होते.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन पदाधिकारी राजू भोगे, प्राचार्य सौ वृषाली देशमुख, श्री सचिन शेगोकर (सकाळ अग्रोवन प्रतिनिधी), विवेक चर्जन(बिझिनेस डेव्हलपमेंट आफिसर, आम्ही बालाजी फाउंडेशन), राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्रा.डी. पि. बोंद्रे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
श्री विवेक चर्जन यांनी नेतृत्वाचे महत्त्व, प्रभावी संवाद कौशल्ये, निर्णयक्षमता आणि सरकारी नोकऱ्यांतील संधी, खाजगी क्षेत्रातील रोजगार, तसेच कृषी व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या बाबींवर सखोल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा निकिता राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा मनीषा लांडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष नंदूशेठ चव्हान, कृषी महाविद्यालयाचे सर्व व्यवस्थापन समिती पदाधिकारी, श्री राजू भाऊ भोगे, प्राचार्य सौ वृषाली देशमुख, प्रा. पी डी राऊत , प्रा एन एस राऊत, प्रा एम एस लांडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डि पि बोंद्रे, प्रा पि. एच. शिवणकर, श्री नंदकिशोर हलमारे आदी सहभागी झाले होते. तसेच विद्यार्थाचे अमूल्य सहकार्य लाभले.