आर. के. ज्ञान मंदिरम येथे कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी

0
29
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

पुलगाव

कृष्ण जन्माष्टमी श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. या निमित्ताने आर. के. ज्ञान मंदिरम इंग्लिश मिडीयम स्कुल नाचणंगाव येथे कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून आर .के. हायस्कूल ट्रस्ट चे मुख्य समन्वयक श्री नूरसिंग जाधव सर हे प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रमुख अतिथी श्री नूरसिंग जाधव सर,शाळेचे प्राचार्य नितिन श्रीवास व पर्यवेक्षिका प्रणिता कोंबे यांच्या हस्ते कृष्ण पूजा करण्यात आली. दिपाली दिने व एदलाबादकर मॅडम यांनी कृष्ण गीत सादर केले. त्यानंतर प्री-प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी तर मैय्या यशोदा, ओ कृष्णा है या गीतावर नृत्य सादर केले. है. काही विद्यार्थी कृष्ण , राधा व वासुदेव यांच्या वेष भूषेत आले होते,कृष्ण , राधा व वासुदेव ,आकर्षक सजावट व दही हांडी हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. प्री-प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी अति उत्साहात या आनंदात दही हांडी फोडली व गाण्यावर फेर धरत नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांच्या या उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधले. प्रमुख अतिथी श्री नूरसिंग जाधव सर,शाळेचे प्राचार्य नितिन श्रीवास व पर्यवेक्षिका प्रणिता कोंबे यांनी कृष्ण जन्माष्टमीचे महत्व व व कृष्ण लीलेच्या महत्वावर आपले विचार प्रस्तुत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाली राऊत व आभार प्रदर्शन एदलाबादकर मॅडम यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांना गोपाळ काला वितरित करण्यात आला. शाळेचे प्राचार्य नितिन श्रीवास व पर्यवेक्षिका प्रणिता कोंबे यांच्या उत्तम मार्गदर्शना खाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

veer nayak

Google Ad