कृष्णा ढोके चे राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सुयश

0
234
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

पुलगाव

कृष्णा हेमंत ढोके, इयत्ता तिसरी आर.के. ज्ञान मंदिरम इंग्लिश मीडियम स्कूल, नाचणगाव पुलगावचा विद्यार्थी याने नांदेड येथे झालेल्या के एस आर एफ आय महाराष्ट्र राज्य कराटे चॅम्पियनशिप 2024 मध्ये दोन सुवर्णपदके मिळवून शाळेचे नाव सम्पूर्ण पुलगाव नगरीत उंचावले आहे. के एस आर एफ आय महाराष्ट्र राज्य कराटे चॅम्पियनशिप 21 जुलै 2024 रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती जी कानाझावा शोटोकॉन रियू फेडरेशन ऑफ इंडिया, रसुलाबाद आणि वर्धा यांनी आयोजित केली होती ज्यामध्ये कृष्णा ढोके याने अनुक्रमे दोन सुवर्ण पदके आणि प्रमाणपत्रे पटकावली.

आपल्या यशाचे श्रेय तो सिहान आत्राम सर, विदर्भ मुख्य संचालक, के एस आर एफ आय आणि कोशी सतनाम सर, त्याचे पालक, शाळा व्यवस्थापन, प्राचार्य नितीन श्रीवास, पर्यवेक्षिका प्रणिता कोंबे, वर्गशिक्षिका शितल इंगळे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मित्रमंडळी व नातेवाईक यांना देतो. शालेय व्यवस्थापन, प्राचार्य श्री. नितीन श्रीवास, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कराटे क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कृष्णा ढोके याचे अभिनंदन केले आहे आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्याला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे.

veer nayak

Google Ad