आर्वी ,प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : दि.३१ जानेवारी, २०२५ ला दिल्ली येथे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले व दि.१ फेब्रुवारी, २०२५ ला देशाचे अर्थसंकल्प सादर करण्यात आले. त्याअनुषंगाने अर्थ मंत्रालयशी संबंधित विविध मागण्यांसंदर्भात खासदार श्री.अमरभाऊ काळे यांनी देशाच्या अर्थमंत्री मा. निर्मला सीतारमनजी यांच्याशी चर्चा केली.
त्याचबरोबर अमरभाऊ काळे यांना वर्धा लोकसभा मतदारसंघातील विविध संघटनांच्या वतीने त्यांच्या विविध मागण्यांकरिता अनेक निवेदन प्राप्त झाले होते, अनेकांनी त्यांच्या समस्या खा. अमरभाऊ काळे यांच्या कडे मांडल्या होत्या. त्या सर्व मागण्यांची दखल घेऊन त्याबाबत सुद्धा अर्थमंत्री. निर्मला सीतारामन जी यांच्या कडे खा. अमरभाऊ काळे यांनी पाठपुरावा केला.