कौंडण्यपूर–पंढरपूर बस सेवा नियमित सुरू करा

0
7
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

कुऱ्हा-वर्धा विभागीय एस.टी. महामंडळाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या आर्वी आगाराकडून श्रीक्षेत्र कौंडण्यपूर ते पंढरपूर अशी नियमित एस.टी. बस सेवा सुरू करावी, अशी मागणी भाविक भक्त व प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे.

 विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि जगतजननी आई रुक्मिणी मातेचे माहेर असलेल्या श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून श्री क्षेत्र पंढरपूर या तीर्थक्षेत्री जाण्यासाठी हजारो भाविक दरवर्षी प्रवास करतात. मात्र, या मार्गावर थेट व नियमित एस.टी. सेवा नसल्याने भाविकांना व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. आर्वी आगारातून कौंडण्यपूर ते पंढरपूर अशी नियमित बससेवा सुरू केल्यास या मार्गावरील प्रवाशांना आणि भाविकांना फार मोठा दिलासा मिळेल.

veer nayak

Google Ad