धामणगाव च्या कराटे चे विद्यार्थ्यांनी पटकावले सुवर्ण पदके

0
1
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे —

श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य द्वारा आयोजित 6 वी खुली राज्यस्तरीय कराटे स्पर्धा 8 मार्च 2026 ला इंडो स्टेडियम जिल्हा क्रीडा संकुल अमरावती येते घेण्यात आली व या कराटे स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध वयगटातील 10 ते 17 वयगटातील 350 मुलांचा काता व कुमिती मध्ये सहभाग नोंदविला व या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, गटनेता चेतन गावंडे, व जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश जाधव यांच्या उपस्थित पार पडली व सेनसाई उमेश मोहळे व चेतन वाटणकर यांच्या हस्ते धामणगाव तील बोधी बुडोकान कराटे च्या विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले त्यामध्ये आरोही राठोड काता मध्ये सुवर्णपदक, पृथ्वीका ढबाले काता व कुमिती मध्ये गोल्ड मेडल व सिल्वर मेडल,

नंदिनी भेंडे काता व कुमिती मध्ये गोल्ड मेडल, व सिल्वर मेडल, सान्वी दे हिला काता व कुमिती मध्ये सिल्वर मेडल व ब्रांच मेडल, रुद्रानी मेटे काता मध्ये ब्राँझ मेडल, जानवी राऊत, काता व कुमीती मध्ये सिल्वर मेडल, ब्रॉज मेडल, अंश समर्थ काता व कुमिती मध्ये सिल्वर मेडल असे धामणगाव तील पदके पटकवले व मास्टर सम्यक दहाट व मास्टर सोनाली गुप्ता यांना सन्मानचिन्ह देण्यात आले व सर्व विध्यार्थी आपले यशाचे श्रय भन्ते धम्मसार, मास्टर मुकेश कांबळे सर, मास्टर आकाश पवार सर, मास्टर सचिन मून सर व आपले आई-वडील यांना देत त्यांचे आभार मानले याशिवाय पालकांनी व धामणगाव वासियांनी सर्वांचे खूप कौतुक केले व अभिनंदन केले व यशासाठी शुभेच्छा दिल्या..

veer nayak

Google Ad