कराटे चमूचे नॅशनल इंटरनॅशनल साठी दिल्ली येथे निवड
धामणगाव रेल्वे- आत्मरक्षण व शारिरीक विकासाच्या दृष्टीने सहावी राज्यस्तरीय कराटे स्पर्धा अकोला येते राज्यातील सर्व डो प्रकारातील कराटेपटू साठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . सदर स्पर्धेसाठी धामणगाव रेल्वे बोधी बुडोकान कराटे विद्यार्थ्यांनी येथून 10 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कराटे चॅम्पियनशिपमध्ये नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, वाशीम, अकोला, जिल्यातील अकोला येथील वसंत देसाई स्टेडियम बहुउद्देशीय हॉल अकोला मध्ये आयोजित 6 वी राज्यस्तरीय कराटे स्पर्धा स्पर्धा अकोला आयोजन दि महाराष्ट्र अॅम्युचर कराटे असोसियशन
नंलग्न NKF कराटे डो फेडरेशन ऑफ इंडिया कराटे या स्पर्धेचे दि. 30 नोव्हेंबर 2025-26 ला आयोजन केले होते. यामध्ये अमरावती जिल्हातील धामणगाव रेल्वे येतील बोधी बुडोकान कराटे 10 विद्यार्थ्यांनी काता व कुमिती मध्ये 20 पदके पटकावले त्यात गोल्ड मेडल काता कुमिती मध्ये निर्मिती सयाम, प्राची सूर्यादय काता सुवर्ण पदक , नंदनी भेंडे काता रौप्य पदक, स्वरा डुबे काता कुमिती रौप्य पदक, सोनाली गुप्ता काता रौप्य पदक, कृष्णा चौधरी कुमिती सुवर्णपदक, काता, रौप्य पदक, शारंगधर गुप्ता काता कुमिती रौप्य पदक, रोहन खोब्रागडे काता कुमिती मध्ये रौप्य पदक, श्री हरी कडू कुमिती सुवर्ण पदक, कनक राठी कुमिती सुवर्ण पदक, व मास्टर सचिन मून यांना ट्राफी देऊन सन्मान करण्यात आला, व मास्टर संमेक दहाट, सचिन चौधरी व यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला व यशाचे श्रेय भन्ते धम्मसार, मास्टर मुकेश कुमार कांबळे, मास्टर आकाश पवार यांना देत विद्यार्थी यांचेसुद्धा मोलाचे सहकार्य लाभले. याशिवाय पालकांनी व धामणगाव वासियांनी सर्वांचे आनंद व्यक्त करीत, खूप कौतुक व अभिनंदन केले आणि यशासाठी शुभेच्छा दिल्या.
















