जुना धामणगाव येथील मॉर्निंग वॉक कार्यरत ग्रुप असलेल्या या सामाजिक दायित्व म्हणून संपूर्ण परिसरातील 61 ज्येष्ठ नागरिकांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
गेल्या 25 वर्षापासून मॉर्निंग वाक हा ग्रुप जुन्या धामणगाव मध्ये कार्यरत आहे असे सामाजिक अनेक उपक्रम राबविले परंतु ज्येष्ठ नागरिकांचा कोठेही सन्मान केला जात नाही आपणही काही समाजाचे देणे लागतो हा उद्देश पुढे ठेवून 61 ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक प्रदीप चौधरी, तर प्रमुख अतिथी म्हणून नारायण मोहतुरे, आनंद रोडगे, दिलीप बायस्कर, राजकुमार कोकणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व सत्कार सोहळा जुना धामणगाव येथील शिव मंदिरामध्ये घेण्यात आला.
ज्यावेळी प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान होत होता त्या वेळेला त्या ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांमधून अश्रू येत होते हे अश्रू दुःखाचे नसून हे सुखाचे अश्रू आहे असे मनोगत व्यक्त करताना अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या मनोगतामधून व्यक्त केले.
यावेळी नितीन टाले यांनी कविता सादर केली. ज्येष्ठ म्हणजे ज्येष्ठ नव्हे तर ते सर्वांसाठी बेस्ट असते..
आलेल्या सर्व पाहून मंडळी सोबत ज्येष्ठ नागरिकांना व या सन्मान सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाला भोजनदान ग्रुपच्या वतीने देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गावंडे तर आभार प्रदर्शन मधुकर खरकाडे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता हिवरे सर, गायकवाड सर, सूर्यकांत रोडगे, प्रमोद यादव,प्रकाश रंधे,किशोर निश्चित, यशोदाबाई रोडगे, शरद वरुडकर,दीपक धार्मिक, कल्पना वरुडकर, हेमा धार्मिक, रीना रोडगे, छाया रोडगे, उमेश रोडगे आदींनी अथक परिश्रम केले या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते व प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक हास्य निर्माण झाले होते हे मात्र या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.