जळगाव मंगरूळ येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रतिमेचे पूजन व महिला आरोग्य तपासणी शिबिरास सुरुवात

0
94
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

जळगाव मंगरूळ

ग्रामविकास व महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आज दि. 19 सप्टेंबर 2025 रोजी प्रार्थमिक आरोग्य केंद्र मंगरूळ दस्तगीर अंतर्गत जळगाव मंगरूळ येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सरपंच मा. श्री मनोज शिवणकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमानिमित्ताने ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’ अंतर्गत महिलांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणी शिबिरास सुरुवात करण्यात आली. महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती, नियमित तपासणीचे महत्त्व तसेच महिलांना सशक्त बनविण्यासाठी शासनाच्या विविध योजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमास ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्यगण, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी शिबिरात सहभागी होऊन तपासणी व सल्ला सेवा दिली.

या उपक्रमामुळे गावातील महिलांना आरोग्य विषयक तपासणी सोयीस्कररीत्या उपलब्ध झाली असून, ग्रामस्थांनी या पाहुण्यांचे स्वागत केले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती दिनानिमित्त दरवर्षी अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.

veer nayak

Google Ad