श्री चंद्रभागेश्वर महादेव देवस्थान येथे अखंड हरीनाम सप्ताह. पत्रकार परिषदेत विश्वस्त मंडळाची माहिती

0
114
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

( चांदुर रेल्वे )

शहरातील प्राचीन असलेल्या महादेव देवस्थान महादेव घाट येथे शनिवार दि 2/3/24 ते दि 9/3/24 पर्यंत अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली. महाशिवरात्री महोत्सवच्या पवित्र पर्वा वर दर वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रीराम कथा ज्ञान यज्ञ, व हरी कीर्तन सोहळा चे आयोजन ठरविण्यात आले आहे या हरिकीर्तन सोहळ्याचा आरंभ शनिवार दि 2/3/24 ला सकाळी 9.00 वाजता होणार असून पूजन व अभिषेक निलेशभाऊ गुल्हाने, बच्चू वानरे, अर्जुन ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. दररोज दुपारी 1 ते 5 या वेळेत ह. भ. प. धनेश्वर महाराज ढोरे, खामगांव यांच्या अमृत तुल्य वाणीतून श्रीराम कथा यज्ञ रामायण होणार आहे. तर दररोज रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत. या मध्ये शनिवार 2/3/24ला आळंदी येथील ह भ प प्रेमदास महाराज यांचे कीर्तन, रविवारी दि 3/3/24ला ह भ प प्रशांत महाराज काकडे, सोमवारी दि 4/3/24ला शेगाव येथील ह भ प विठ्ठल महाराज शेळके, मंगळवारी दि दि 05/3/24ला ह भ प अक्षय महाराज हरणे, बुधवारी दि 6/3/24ला ह भ प विठ्ठल महाराज, गुरुवार दि 07/3/24ला सायंकाळी 5 वाजता भव्य वारकरी दिंडी सोहळा तर शुक्रवारी दि 8/3/24ला ह भ प राजेंद्र महाराज म्हस्के यांचे कीर्तन होणार आहे.

तर शनिवार दि 9/3/24 ला गोपाळ काला व काल्याचे कीर्तन दु 12 ते 3 वाजता होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत महाप्रसादचे आयोजन करण्यात आलेले आहे. याच दरम्यान संस्थानचे वतीने सामाजिक उपक्रम म्हणून दि 2/3/24ला मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला उदघाटक म्हणून वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रतापदादा अडसड, विधान परिषद आमदार प्रवीणभाऊ पोटे, माजी आमदार प्रा वीरेंद्र जगताप हे उपस्थित राहणार आहेत. या आरोग्य शिबिराला डॉ पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर हे आरोग्य तपासणी करतील. यामध्ये मेडिकल विभाग, अस्थीरोग, सर्जरी, नेत्र रोग, स्त्री रोग, बाल रोग, त्वचा रोग विभागाचे डॉक्टर्स उपस्थित राहणार आहेत.

सर्व रोगावर मोफत तपासणी व उपचार या शिबिरात केले जाणार असून म फुले आरोग्य योजने अंतर्गत मोफत ऑपरेशन करण्यात येईल. रुग्णांनी येतांना सोबत आधार कार्ड व रेशन कार्ड आणावे. रोग निदान शिबिरात ग्रामीण रुग्णालयाची चमू शुगर, थॉय राईड, बी. पि. तपासणी करणार आहे.तर डॉ आर बी पाटील हे दंत तपासणी करतील. सर्व शिबीर नोंदणी रुग्णांनी डॉ प्रशांत कोठेकर यांच्या दवाखान्यात करावी असे आव्हान आयोजक यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला संस्थानचे अध्यक्ष कैलास गिरोळकर, कार्याध्यक्ष बच्चू वानरे, कोषाध्यक्ष सुनील अग्रवाल, सचिव डॉ प्रशांत कोठेकर, सहसचिव निलेश गुल्हाने हे उपस्थित होते. या होणाऱ्या सप्ताहास तन, मन, धनाने सर्वांनी मदत करण्याचे आव्हान विश्वस्त मंडळाने केले आहे.

veer nayak

Google Ad