चांदुर रेल्वे / हल्ली कुऱ्हा ते नांदगाव खंडे पर्यंत सिमेंट रोड बनवण्याचे काम एका कंपनी कडून चालू आहे,सदर कंपनीचे RMC प्लांट हे पळसखेड रोडवर असून इथून गिट्टी सिमेंट मिश्रित बनवलेले माल काम चालू असलेल्या रोडवर टाकण्यात येत आहे, सदर कंपनीचे ट्रक हे या मालाची वाहतूक शहराच्या मुख्य मार्गावरून करत असताना या ट्रक मधून गिट्टी सिमेंट मिश्रित मलबा(माल)अनेक ठिकाणी सांडात असून या सांडलेल्या मलबा ( माला) वरून अनेक दुचाकी वाहन घसरून आता पर्यंत अनेक अपघात झाले ता 13 शुक्रवार रोजी प्रदीप कुबडे नामक इसम गिट्टी सिमेंटच्या मलब्यावरून गाडी घसरून पडले असून त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे, या ट्रकांमधून वाहतुकीच्या वेळी रस्त्यावर सांडलेल्या सिमेंट मुळे मुख्य मार्गावर धुळीच्या साम्राज्य पसरत आहे,शहरातील हा मुख्य मार्ग असून याच मार्गावर मुख्य बाजारपेठ,शाळा,कॉलेज, दवाखाने तहसील कार्यालय नगरपरिषद कार्यालय पंचायत समिती कार्यालय,कोर्ट,असून या मुख्य मार्गावर नेहमीच वर्दळ असते शहरातील व कामानिमित्त ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना रस्त्या वरून दुचाकी चालवत असताना तारेवरती कसरत करावी लागत असून रस्त्यावर सांडलेल्या सिमेंटच्या मलब्यामुळे धुळीचा सामना करावा लागत आहे,यासंदर्भात भाजपा पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने कंपनीच्या सुपरवायझर यांना सांगण्यात आले, मात्र कंपनीकडून या बाबतीत कोणती दखल घेण्यात आली नसून ता 14 शनिवार रोजी कार्यकर्त्यांनी या कंपनीच्या विरोधात पोलीस स्टेशन चांदुर रेल्वे येथे तक्रार दाखल केली कंपनीला याबाबतीत तंबी देण्यात यावी किंवा भविष्य या कारणामुळे कोणत्याही इसमाचा अपघाती मृत्यू झाल्यास सदर कंपनीवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,
निवेदन देतेवेळी भाजप पक्षाचे गटनेते पप्पू भालेराव, नगरसेवक प्रावीण्य देशमुख, गजानन ठाकरे,दुर्गाताई भूत, अंकित कदम, प्रतीक राय,छोटू देशमुख,ओम प्रकाश मानकर, अजय हजारे,नितीन देशमुख, विजय मिसाळ गजानन चोरे, सह अनेक नागरिक यावेळी हजर होते,














