राज्यस्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धेत आर्वीच्या खेळाडूंनी 2 रजत पदक व 6 कांस्य पदक मिळवण्यात आले यश

0
42
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले

आर्वी : राज्यस्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धेत आर्वीच्या खेळाडूंनी 2 रजत पदक व 6 कांस्य पदक प्राप्त केले. मनेराजुरी येथे 17 – 19 जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय थायबॉक्सिंग( शालेय ) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध विभागातील खेळाडूंनी सहभाग घेतला.

या स्पर्धेत पमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी सांगली मा. श्री.किरण बोरवेडकर व राष्ट्रीय थायबॉक्सिंग अससोसिएशन चे अध्यक्ष मा. श्री. पाशा अत्तार लाभले.

कार्यक्रमाचे आयोजक मा. श्री.विशाल माळी (महाराष्ट्र थायबॉक्सिंग फेडरेशन चे कार्याध्यक्ष) .

दरवर्षीप्रमाणे यंदाही आर्वीच्या मुलांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

या स्पर्धेत 17 वर्षा खालील वयोगटात: कु. वैष्णवी जयस्वाल हिने रौप्य पदक, तर कु.दिशा गोतमारे, चि.अनुराग भुयार, कु.रिदा नाज, चि. कार्तिक चौकडे, आदर्श लवटे, कुमारी ऋतुंबरा कळंबे या पाचाही विद्यार्थ्यांनी कांस्य पदक पटकवीले तसेच 19 वर्षा खालील वयोगटात चि. आर्यांश वडणारे यांनी रौप्य पदक पटकविले.

वर्धा थायबॉक्सिंग असोसिएशन चे अध्यक्ष मा. संग्राम मोहिते, उपाध्यक्ष मा. नरेश वडणारे, सचिव मा. मो. सलीम शेख व सह सचिव मो. मोहिन शेख , यांनी सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचाली साठी त्यांचे मनोबल वाढवले. या यशाचे श्रेय मोहम्मद सलीम सर आणि त्यांच्या पालकांना जाते.

veer nayak

Google Ad