चांदूर रेल्वे / सरिदार पावसात ही तालुक्यातील बहिणी डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांना राखी बांधण्यासाठी आल्या निमित्त होते जयहिंद क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्म समभाव रक्षाबंधन सोहळ्याचे, यावेळी निलेश विश्वकर्मा यांनी नेहमी बहिणीच्या पाठीशी उभा राहण्याचे वचन ही दिले, सामाजिक राजकीय क्षेत्रासह जय हिंद क्रिडा मंडळा तर्फे विविध क्रिडा स्पर्धेचे आयोजन करून मतदारसंघात आपल्या कर्तृत्वाने व कार्याने नावलौकिक करणारा सर्व बहिणीचा लाडका भाऊ डॉ निलेश विश्वकर्मा यांनी 19 आॅगस्ट सोमवार ला संताबाई यादव मंगल कार्यालयात सामुहिक रक्षाबंधन सोहळ्या चे आयोजन करण्यात आले होते,
वंचित चे प्रदेशाध्यक्ष डॉ निलेश विश्वकर्मा यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्थानिक संताबाई यादव मंगल कार्यालयात सामुहिक रक्षाबंधन सोहळ्य चे आयोजन केले होते, या रक्षाबंधन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मतदारसंघातील शेकडो बहिणींनी पावसाची पर्वा न करता या ठिकाणी आल्या व निलेश विश्वकर्मा यांना लाडक्या बहिणीकडून राखी बांधण्यात आली, यावेळी निलेश विश्वकर्मा म्हणाले की मी या बहिणींच्या प्रेमाच्या जोरावर मी आजवर मोठा होत गेलो आहे. आपल्या प्रेमाची ओढ सदैव माझ्या पाठीशी आहे, बहिणीचे प्रेम मला सदैव मिळत राहो, या अपेक्षेसह आपला हक्काचा भाऊ आपल्या पाठीशी उभा राहणार, यावेळी निलेश विश्वकर्मा सोबत मंचावर अनेक मान्यवर उपस्थित होते तर संपूर्ण मंगल कार्यालयाचा हॉल हा आलेल्या बहिणींनी गच्च भरलेला होता,