आर्वी, प्रतिनिधी / पंकज गोडबोले
आर्वी : नगर पालिका निवडणुकीकरिता कॉग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्त्यांची पक्ष सोडल्याच्या चर्चा होऊ लागल्या हात्या परंतु पूर्व काही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी डाव रचून पक्षातच फूट पडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अनंत मोहोड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी आम्ही तुमच्यासोबत आहोत असे ग्वाही दिली, तसेच कोणत्याही कार्यकर्त्याने पक्षत्याग केला नसून, सर्व कग्रेससोबतच असल्याची माहिती कॉग्रेस कमिटीचे प्रदेश महासचिव अनंत मोहोड यांनी सर्व पत्रकारासमोर दिली. पालिका निवडणुकीकरिता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार व सर्व प्रभागांमधून 25 उमेदवार तयार करण्यात आले होते. परंतु काही पूर्व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी स्थानिक पक्षाच्या नेत्यांना सोबत न घेता हा डाव रचल्याने इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म वेळेत मिळू शकले नाहीत. त्यामुळे सर्वांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आपल्या सोबत जे काही घडलेलं आहे याबाबत अनंत मोहोड यांनी पक्षाच्या सर्व उपस्थिती पदाधिकाऱ्यांना लक्षात आणून देत नाराज झालेल्यांची समजूत काढण्याचा प्र्यल्ल केला. त्यामुळे अपवाद वगळता सर्वांचीच नाराजी दूर झाली. पण, नेहमीप्रमाणे काही जण गांधी चौकातील भाजपची सभा ऐकण्यासाठी गेले असता दोघाना कोणतीही पूर्वकल्पना न देता स्टेजवर बोलावून त्यांच्या गळ्यात पक्षाचा दुपट्टा टाकला. यासंदर्भात पक्षप्रवेशाची चर्चाही झाली. परंतु नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सोडून आजही सर्व आमच्या सोबत आहे व ज्यांच्या नावाची भाजपच्या सभा मंचावरून घोषणा करण्यात आली होती. व चर्चा झाली होती भाजप पक्षांनी काही लोकांचे नावे टाकून पक्ष प्रवेशाची काही वृत्तपत्रांना खोटी माहिती देऊन बातमी सुद्धा प्रकाशित करून घेतली. मात्र श्रीकृष्ण परतेकी, विनोद हुड, पंकज गोडबोले, निखिल डोरले, राखी बिराेले, प्रेमीला वासुदेव सुरजुसे, सुधाकर वाघमारे, व छाया दिनेश चव्हाण हे पक्षा सोबतच आहे. कुणीही पक्ष सोडलेला नाही, असे काँग्रेस कार्यालयात पत्रकारांच्या व सर्व एकनिष्ठ पक्ष कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अनंत मोहोड यांनी सांगितले.
















