नांदगांव खंडेश्वर/
तालुक्यात मोदी आवास योजना ग्रामीण अंतर्गत शेकडो पात्र लाभार्थ्यांनि घरकुलाचे काम पूर्ण करून सुद्धा आठ महिन्यापासून अनुदान मिळत नसल्याने लाभार्थ्यांनि शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात पंचायत समिती कार्यालयात धडक देऊन सात दिवसांत निधी न मिळाल्यास राहुटी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला
नांदगांव तालुक्यातील पापळ वाढोना वेणी गणेशपूर सालोड मांजरी म्हसला माहुली चोर मंगरूळ चवाळा सातरगाव कंझंरा शिवणी लोणी वाघोडा इत्यादी गावातील लाभार्थ्यांना मोदी आवास योजना ग्रामीण अंतर्गत प्रथम हप्त्याचे अनुदान देण्यात आले त्यानुसार लाभार्थ्यांनि घरकुलाचे बांधकाम सुरू करून आठ महिन्याचा कालावधी होत असताना अनुदान न मिळाल्याने उर्वरित कामा मुळे घरकुलाचे काम अर्धवट राहिले असून लाभार्थ्यांना भाड्याच्या घरात राहावे लागत आहे तर अनेक लाभार्थ्यांनि उसनवारी करून संपूर्ण घरकुलाचे बांधकाम केले मात्र अनुदान न दिल्याने उसनवारी व्यजासह चुकवावी लागत आहे त्यामुळे लाभार्थी हतबल झाले असून शेकडो लाभार्थ्यांनि पंचायत समिती कार्यलयात गटविकास अधिकारी यांना घेराव करून सात दिवसात सदर योजनेचा उर्वरित निधी द्यावा अन्यथा राहुटी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला यावेळी शिवसेनेचे प्रकाश मारोटकर बाजार समितीचे संचालक विजय अजबले सरपंच लाभार्थी मारोती गवडगे जयवताबाई रोहणेकर योगेश्वर चोरे अनिल गाडगे राहुल बोदडे अनिल डाखोरे गणेश सोळंके जीजाबाई ठाकरे सुधाकर कोपरे गणेश राऊत पंढरी बोदडे हरिदास काळसरपे हरिभाऊ येवतकर इत्यादी लाभार्थी उपस्थित होते
तालुक्यातील मोदी आवास योजनेचे विहीर अनुदानाचे गोठा अनुदान पंतप्रधान घरकुल योजना इत्यादी योजनेचे पैसे या सरकारने थांबविले असून सर्व पैसे लाडकी बहीण योजनेवर ट्रान्स्फर केले मात्र हा ग्रामीण लाभार्थी अनेक योजनेच्या अनुदाना पासून वंचित आहे सात दिवसांत अनुदान न दिल्यास राहुटी आंदोलन करू असा इशारा शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी दिला.