चांदूर रेल्वे तालुका प्रतिनिधी
चांदूर रेल्वे शहरातील प्रतिष्ठीत नागरिक समीप वानखडे यांच्या सौभाग्यवाती सौ.सपना समीप वानखडे ह्या आपल्या नुकत्याच परिवारासह नेपाळ येथे पशुपतिनाथ दर्शनाला गेले असता त्याठिकाणी २९ डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय “फोक डान्स सुपर मॉम कॉम्पिटिशन’ मध्ये चांदुर रेल्वे येथील सौ सपना समीप वानखडे यांनी आपली अप्रतिम कला दाखवीत प्रथम पारितोषिक पटकविले. ह्या प्रसंगी त्यांचा गुरुवर्य स्वामीजिच्या शिष्या स्मिताजी रा. दिल्ली यांनी सौ.वानखडे ह्यांना ट्राफी प्रदान करून त्यांचा येथोचीत सत्कार केला. नेपाळ येथे आयोजित डान्स कॉम्पिटिशन राजस्थान ,छत्तीसगड, ओडीसा ,मध्य प्रदेश ,केरळ ,गुजरात या सारख्या अनेक राज्यातून असंख्य महिलांनी सहभाग घेतला होता . सौ सपना वानखडे ह्यांनी सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत आपल्या मध्ये असणारी अप्रतिम कला आपल्या नृत्या च्या माध्यमातूम ह्या कार्यक्रमात सादर केले व प्रथम पारितोषिक सुद्धा प्राप्त केले ,ह्या त्यांच्या भरीव कामगिरीबद्दल चांदूर शहरवासी त्यांचेवर कौतुकाचा वर्षाव करत आहे.