शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धामणगाव रेल्वे तालुका . महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, कुटुंबप्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय. उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धामणगाव रेल्वे तालुक्यातील प्रत्येक शाखेमध्ये सामाजिक उपक्रम राबविण्याचे अमरावती जिल्हा प्रमुख मनोजभाऊ कडू यांच्या आदेशाने धामणगाव रेल्वे तालुकाप्रमुख नानाभाऊ देऊळकर यांच्या नेतृत्वात वडगाव (राजदी) या शाखेद्वारे येथील विभाग प्रमुख नंदूभाऊ डुकरे यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा वडगाव (राजदी) येथे प्रमुख पाहुणे अमरावती जिल्हाप्रमुख मनोजभाऊ कडू व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचा पेन व नोटबुक, खाऊ चे वाटप करण्यात आले. यावेळी गावचे माजी सरपंच श्रीधरराव हांडे, चांदुर रेल्वेचे माजी तालुकाप्रमुख संजयभाऊ चौधरी, धामणगाव रेल्वे शहरप्रमुख गोपालभाऊ मोकलकर, उपशहर प्रमुख संतोषभाऊ गावंडे, शाखाप्रमुख अंकुश तुपट, सुनील वैद्य, उमेश रामटेके, अशोक वाघाडे, सतीश बेलसरे, दिलीप सहारे, रत्नाकर पाटील, संतोष तुपट, मुख्याध्यापिका सौ. पद्माताई कुबडे, श्री. किसनराव वानखडे सर, सौ. रेणुका ताई हांडे व गावातील शिवसैनिक उपस्थित होते.
Home आपला विदर्भ अमरावती सन्माननीय. उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात आले