गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडून चांदूर रेल्वे नवीन पोलिस ठाण्याची पाहणी. जीम, स्विमींग पुल बांधण्याच्या सूचना

0
56
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती, दि. 25(जिमाका) : गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज चांदूर रेल्वे येथील पोलिस ठाण्याला भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पोलिस ठाण्याची माहिती घेतली. त्यानंतर बांधकाम सुरू असलेल्या नवीन पोलिस ठाण्याची पाहणी केली.

यावेळी आमदार प्रताप अडसड, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, उपविभागीय अधिकारी तेजस्वीनी कोरे आदी उपस्थित होते.

गृहराज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सुरवातीला चांदूर रेल्वे पोलिस ठाण्याला भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडून जिल्ह्यातील पोलिस ठाण्याच्या इमारतींची माहिती घेतील. त्यांनी जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांच्या इमारतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. याला मंजुरी मिळताच तातडीने कामे पूर्ण करण्यात येतील, असे सांगितले. यानंतर डॉ. भोयर यांनी बांधकाम सुरू असलेल्या पोलिस ठाण्याची पाहणी केली. बांधकाम गतीने पूर्ण करावेत, तसेच चांगल्या दर्जाचे काम करण्याच्या सूचना दिल्या. नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष असल्याची माहिती देण्यात आली. तालुक्यातील इतरही इमारतींचे कामे पूर्ण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

आसेगाव पुर्णा, चांदूर रेल्वे आणि बेनोडा या तीन नवीन पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी 12 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. हे काम नोव्हेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याचे सुमारे 1 हजार चौरस मीटरचे बांधकाम होणार आहे. तळमजला आणि पहिला मजला सुविधांसह बांधकाम करण्यात येणार आहे. पोलिस ठाण्याचे करण्यात येणारे बांधकाम चांगल्या प्रतीचे करावे, अशा सूचना डॉ. भोयर यांनी केल्या. तसेच चांदूर रेल्वे येथे नागरिकांच्या सोयीसाठी उत्कृष्ठ प्रतिचा स्विमिंग पूल आणि जीम प्रस्तावित करावा. यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करावा. या स्विमिंग पूल आणि जीमची देखभाल, दुरूस्ती पोलिस विभागाने करावे. यामुळे या सुविधा सुव्यवस्थित राहण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

veer nayak

Google Ad