धामणगाव रेल्वे
श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शैक्षणिक संस्था द्वारा संचालित स्कुल ऑफ स्कॉलर्स येथे होळी व राष्ट्रीय जल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका के साई नीरजा यांनी सर्वप्रथम सरस्वती मातेचे पूजन केले व शाळेतील विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी होळी बद्दल आपले विचार आपल्या भाषणातुन व्यक्त केले व पाण्याविषयी महत्त्वाची माहिती दिली तसेच पाणी आपल्या जीवनासाठी किती महत्त्वाचे आहे आणि ते कसे वाचवले पाहिजे यावर आधारित नाटक सादर केले. यासाठी त्यांना नृत्य शिक्षक सचिन उईके यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका के साई नीरजा यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करून होळी का साजरी केली जाते आणि पाण्याची बचत का केली पाहिजे यावर आपले विचार मांडले. होळी निमित्त सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत होलिका दहन करण्यात आले व सर्व विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आली.
यावेळी विशेष संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.शाळेच्या प्राचार्या के साई नीरजा, शिक्षक, ग्रीन हाऊस सदस्य व संस्था समिती यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.