धामणगाव रेल्वे…
धामणगाव शहरातील १४७ वर्ष प्राचीन गौरक्षण संस्थेमध्ये गोवंश शेड व चारा गोदाम बांधकामाचे भूमिपूजन महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या शुभ हस्ते तर आमदार प्रताप अडसड यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विशेष उपस्थित असलेले गोसेवा आयोगाचे सदस्य सुनील सूर्यवंशी प्रसिद्ध समाजसेवक राधेश्याम मुंदडा पशुसंवर्धन सह उपायुक्त डॉ. पूनम नागपुरे, संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी यांच्या हस्ते करण्यात आले
गौरक्षण संस्थेच्या आवारात गोवंश शेड करिता महाराष्ट्र गोसेवा आयोग, महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश योजना निधीमधून धामणगावच्या गौरक्षण संस्थेला २५ लक्ष रुपये मंजूर झाले तसेच अतिराज (मुंदडा) परिवार तर्फे ४ लक्ष रुपये देणगी प्राप्त झाली असून या निधीमधून गोवंश शेड व चारा गोदाम बांधकामाचे भूमिपूजन उपरोक्त मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले
————————–
राज्यातील सर्व गौरक्षण संस्था क्रमांक १ वर आणणार….शेखर मुंदडा
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला महाराष्ट्र गो सेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्त केले मी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व मंत्रिमंडळाने गोमातेला राज्य माता दर्जा दिला तसेच गौरक्षणच्या प्रत्येक गाईच्या चारापाण्याकरिता प्रत्येकी १ गाय ५० रुपये दररोज प्रमाणे अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे स्वागत करीत असून मी व माझ्या ७ सदस्यांनी गौरक्षण व गौसेवा बाबत १० व्हिजन तयार केले आहे संपूर्ण भारतात महाराष्ट्राला गौरक्षण बाबत आणि गौसेवी बाबत प्रथम क्रमांकावर आणायचा आमचा उद्देश आहे या उद्देशाने आम्ही आमच्या विजन वर काम करणे सुरू केलेले आहे या कार्याकरिता आम्हाला राज्य शासनासोबतच सामाजिक संस्थांचा सुद्धा सहकार्य मिळत असून आम्ही गौसेवा आयोगाला एका उच्च स्तरावर स्थान प्राप्त करून घेऊ आम्ही अनेक संत महंत यांचे सुद्धा भेट घेतलेली आहे संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी सुद्धा आम्हाला गौसेवा व गोरक्षण च्या दृष्टीने महत्वपूर्ण उपयोगी असे मार्गदर्शन केले आहे आम्ही ५०० गौरक्षण संस्थेला भेट दिलेले असून गौरक्षण च्या आणि गौमातेच्या समस्यांबाबत अभ्यास केलेला आहे आम्ही राज्य सरकारच्या गौसेवा आयोगामार्फत प्रत्येक तालुक्याला गोवंश शेड देण्याचे निश्चित केलेले आहे असे प्रतिपादन उक्त प्रसंगी गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी गौरक्षण संस्थेत व्यक्त केले
———————————–
गौरक्षण ला अनुदान ऐतिहासिक निर्णय…अडसड
राज्य सरकारने राज्यातील सर्व गौरक्षण संस्थांना अनुदानाचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे गौरक्षण आणि गौसेवा अधिक बलाढ्य होईल या निर्णयाकरिता राज्य सरकार अभिनंदनास पात्र असल्याचे तसेच धामणगाव मतदार संघातील तीनही गौरक्षण संस्थेला महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या वतीने देण्यात आलेल्या अनुदाना करिता मी शेखर मुंदडा व राज्य शासनाचे आभार व्यक्त करतो असे याप्रसंगी आमदार प्रताप अडसड म्हणाले
——————————-
गौसेवेकरिता आयोग तत्पर.. सूर्यवंशी
गौरक्षण मध्ये गौसेवीची उत्तम सेवा व्हावी याकरिता राज्याच्या सरकारने तसेच गौसेवा आयोगाने अनेक योजना कार्यान्वित केलेल्या असून या योजनेचा लाभ सर्व गौरक्षण संस्थांना होईलच यामुळे आता गौरक्षण संस्थांचे सेवेचे कार्य अधिक बळकटपणे होईल असे विचार यावेळी गौसेवा आयोगाचे सदस्य सुनील सूर्यवंशी यांनी व्यक्त केले
गौरक्षण संस्थेचा इतिहास व प्रगती अहवाल आपल्या प्रास्ताविकेमधून संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी यांनी मांडला
कार्यक्रमाप्रसंगी आस्था व संस्कार चॅनल फेम दिनेश शर्मा यांनी गौमातेवर भजनाची प्रस्तुती केली
भूमिपूजनाच्या पूर्वी आचार्य शरद पांडे व प्रणव मिश्रा यांच्या मंत्रोपचाराने गौपूजन करण्यात आले मान्यवरांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष गिरीश मुंदडा सचिव संजय राठी सहसचिव रवि टावरी संचालक आकाश पनपालिया यांनी केले संचालन सदस्य कमल छांगाणी परिचय आभार संचालक रामेश्वर चांडक यांनी मानलेत