शिदोडी व नायगाव या गावाला चक्रीवादळाचा फटका
शिदोडी व नायगाव तालुका धामणगाव रेल्वे येथे अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले असून घरावरील टिन पत्रे पूर्णतः उडून गेली
आमदार प्रतापदादा अडसड यांचे संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या उपाययोजना करत मदत करण्याचे निर्देश.
शिदोडी तालुका धामणगाव रेल्वे येथे अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले असून घरावरील टिन पत्रे पूर्णतः उडून गेली याची माहिती आमदार प्रतापदादा अडसड यांना होताच त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी अमरावती व तहसीलदार धामणगाव रेल्वे यांना योग्य त्या उपाययोजना करून मदत करण्याचे निर्देश दिले.
तसेच गरज भासल्यास आपातकालीन व्यवस्थेला सुद्धा तेथे प्रचारण करावे असेही निर्देश दिलेत*l