श्री दत्ताजी मेघे बालकल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित एस ओ एस कब्स येथे पालकांसाठी हॅप्पी पॅरेंटिंग आणि फोस्टरिंग हेल्दी हॅबिट्स या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला अतिथी म्हणून मानसशास्त्रीय सल्लागार चैताली भोंगाडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. प्री प्रायमरी हेड माननीय शबाना खान मॅडम यांनी मुख्य अतिथी चैताली मॅडम यांचे वेलकम कार्ड व सॅपलींग देऊन स्वागत केले.
चैताली भोंगाडे मॅडम यांनी मुलांना चांगल्या सवयी लावणे तसेच मुलांसोबत नातं अधिक घट्ट करण्यासाठी आपला वेळातील वेळ काढून आई-वडिलांनी मुलांना शक्य तितका वेळ द्यावा तसेच मुलांना योग्य आहार दिल्याने त्यांची शारीरिक स्थिती सुद्धा तंदुरुस्त राहते याबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन शिक्षिका वर्षा देशमुख तर आभार प्रदर्शन प्रणिता जोशी मॅडम यांनी केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय प्रचिती धर्माधिकारी मॅडम व प्री प्रायमरी हेड माननीय शबाना खान मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षिका प्रणिता जोशी, रेणुका सबाने, वर्षा देशमुख, राणी रावेकर, आकांक्षा महल्ले, प्राजक्ता दारुंडे, श्रद्धा रॉय आणि अश्विनी नांदणे यांचे योगदान लाभले.