धामणगाव रेल्वे:-
माणसाला माणुसकीची शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज गुरुकुंज मोझरी यांची पुण्यतिथी दिनांक 21 ऑक्टोंबर 2024 ,सोमवार ला साजरी होत आहे. गुरुदेवांना मौन श्रद्धांजली देण्याकरिता धामणगाव मार्गाने जाणाऱ्या हजारो भक्तांकरिता श्रीगुरुदेव लंगर समिती सज्ज असून हजारो भक्तां करिता महाप्रसादा चे आयोजन करण्यात आले आहे या अनुषंगाने 56 व्या पुण्यतिथि महोत्सवात संपूर्ण महाराष्ट्र, तेलंगाना, आंध्र प्रदेश तुन गुरुदेव भक्त मौन श्रृद्धांजलि करिता एकत्रित होतात, श्री गुरुदेवभत्त या मौन श्रद्धांजली करता धामणगाव मार्गाने गुरुकुंज मोझरी येथे शेकडो गाड्यांनी मार्गक्रमण करतात या गुरुदेव भक्तांकरिता दरवर्षीप्रमाणे श्रीगुरुदेव लंगर सेवा समिति धामणगांव रेल्वे तर्फे भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम सेवातीर्थ अंजनसिंगी रोड, धामणगांव रेल्वे येथे नागरी सहभाभातुन आयोजित करण्यात येतो यावर्षी सुद्धा गुरुदेव भक्तांकर्ता धामणगाव नगरीतील गुरुदेव भक्त सज्ज असून गुरुदेवांना मौन श्रद्धांजली करता येणाऱ्या प्रत्येक भक्ताला महाप्रसाद प्राप्त व्हावा या उद्देशाने येथे आयोजन करण्यात आलेले आहे.
सकाळी ८ वाजतापासुन दुपारी ३ वाजेपर्यंत महाप्रसाद सुरू राहणार असून सर्व गुरुदेव भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती श्रीगुरुदेव लंगर सेवा समीती, धामणगांव रेल्वे तर्फे करण्यात आली आहे.
गुरुदेव लंगर सेवा समिती चे गोपाल भूत चेतन कोठारी व इतर सर्व सदस्य धामणगाव तालुका गुरुदेव समिती व सर्व गुरुदेव भक्त जोमाने तयारीला लागले आहेत