धामणगाव रेल्वे :
अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या आगमनानिमित्त आमदार श्री. प्रतापदादा अडसड यांनी त्यांचे भव्य स्वागत केले.
यावेळी धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत समन्वय साधून मेहनत घेण्याचे आवाहन केले.
या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार डॉ. अनिलजी बोंडे, आमदार प्रतापदादा अडसड, आमदार राजेशजी वानखेडे, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविराजजी देशमुख, निवडणूक प्रमुख रावसाहेबजी रोठे, शहराध्यक्ष दर्शनजी राठी, चांदूर रेल्वे शहराध्यक्ष नवीन वाधवाणी, माजी तालुकाध्यक्ष विवेकजी चौधरी, प्रणवभाऊ राजनकर, उत्तमरावजी ठाकरे, संदीपजी सोळंके, महिला जिल्हाध्यक्षा अनिताताई तिखिले, सरचिटणीस ज्योतीताई पाटील, माजी जि.प. सदस्य रवींद्रजी मंदे, पंकजभाऊ मेटे, निकेतभाऊ ठाकरे, कार्यकारिणी सदस्य विवेकजी गुल्हाने, माजी संचालक रामदासजी निस्ताने, पंकजभाऊ गायकवाड, उत्तर भारतीय मोर्चा रविंद्रजी उपाध्याय यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्यात कार्यकर्त्यांचा उत्साह आणि एकजुटीचे दर्शन घडले. संपूर्ण कार्यक्रमात आमदार प्रतापदादा अडसड यांनी अतिथींचे स्वागत करत भाजपाची संघटनबांधणी व विकासकार्यांवर भर देण्याचे आवाहन केले.












