धामणगाव रेल्वे प्रतिनिधी
डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला सलग्नित व श्री संत शंकर महाराज आश्रम द्वारा संचालित श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय, पिंपळखुटा द्वारा राष्ट्रीय योजना विशेष शिबिर दत्त ग्राम मंगरूळ दस्तगीर येथे दिनांक 8/1/26 ते 25/1/2026 दरम्यान संपन्न होत आहे. यामध्ये नुकतेच डॉ. राजेंद्र गोडे वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती व श्री संत बुधाजी महाराज ग्रामीण रुग्णालय, पिंपळखुटा यांचे द्वारा रक्तदान शिबिर व रोगनिदान शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन मंगरूळ दस्तगीर चे सरपंच श्री सतीश हजारे व उपसरपंच गिरीश सुरोसे तसेच डॉक्टर राठी यांचे द्वारे करण्यात आले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक मंगेश मारोडकर, विजय मेश्राम, प्रफुल डाफ ,प्रमोद आंबटकर, उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पूजन करण्यात आले. यानंतर डॉ.राठी, डॉ अर्चित गुप्ता, डॉ.राहुल बिजवे, डॉ.गोपाल कापसे व इतर उपस्थित डॉक्टरांचे पथकाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी स्वयंसेवक व गावकरी मिळून एकूण 36 रक्तदात्यांनी रक्तदान केले त्याचप्रमाणे 194 गावकरी व स्वयंसेवक यांचे रोग निदान करण्यात आले. यावेळी स्त्रीरोग निदान, अस्थिरोग निदान, नेत्ररोग निदान, शल्य चिकित्सा निदान, प्राथमिक उपचार शिबिराद्वारे तज्ञ डॉक्टरांद्वारे रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी गरजू रुग्णांना मोफत औषध वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिकेत बाभुळकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन कुमारी गौरी मानकर हिने केले.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री नंदूशेठ चव्हाण मंगरूळ दस्तगीर चे सरपंच श्री. सतीश हजारे, उपसरपंच गिरीश सुरोसे, विजयराव मेश्राम, प्रफुल डाफ, महाविद्यालयाचे स्थानिक व्यवस्थापन पदाधिकारी श्री. महादेव शिवणकर, एडवोकेट प्रकाशराव देशमुख, प्राचार्य डॉ. शरद नायक, अश्विन इंगळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. दीपक बोंद्रे, प्रा पवन शिवनकर, सुहास आप्तूरकर, प्रा.वृषाली देशमुख, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांचे अमूल्य सहकार्य प्राप्त झाले.
















