राष्ट्र उभारणीसाठी सशक्त युवक हा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे – ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे.

0
1
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित. श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा द्वारा राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर दत्तकग्राम शिदोडी येथे स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.

राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरामध्ये युवा दिनानिमित्ताने कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक दीपक बोंद्रे, श्री अंकुश डुकरे व इतर मान्यवर उपस्थित होते सर्व पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व युवा दिनानिमित्त युवकांच्या हस्ते व पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून विनम्र अभिवादन केले. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक ग्रामगीताचारी हनुमंत ठाकरे यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले उठा जागे व्हा संघर्ष करा शांत बसू नका आपले ध्येय गाठा असा संदेश युवकांना दिला. स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर प्रकाश टाकताना ते म्हणाले युवक हा महत्त्वाचा घटक आहे ज्या राष्ट्राचा युवक दुर्बल आहे ते राष्ट्र दुर्बल आहे. त्यासाठी राष्ट्रबांधणी चांगली करायची असेल तर त्या राष्ट्राची उभारणी करण्यासाठी सशक्त युवक हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कारण आज युवक दिशाहीन झालेला आहे त्यामुळे युवकांना आपल्या ध्येयाची जाणीव राहिली नाही. म्हणून आज युवकांना संघटित करून समाजाविषयी राष्ट्राविषयी प्रेम, आपुलकी ,जिव्हाळा, निर्माण करणे काळाची गरज आहे. आज समाजात युवक संस्कारहिन असल्याने खून ,बलात्कार ,दरोडे, याचे प्रमाण वाढलेले आहे .आणि यामध्ये युवकांचे प्रमाण जास्त आहे. त्यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराज ,विरभगतशिंग, राजगुरू ,सुखदेव ,यासारख्या राजबिंड्या तरुणांचा आदर्श घेऊन राष्ट्राचे भविष्य उज्वल करण्यासाठी द्रष्टा युवक महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे .राष्ट्रमाता जिजाऊंनी चांगले संस्कार आपला पुत्र श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांवर केले म्हणूनच आज छत्रपतींचे नाव जगात अजरामर आहे .असे व्यक्तिमत्व आपले घडावे. स्वामी विवेकानंदांचा व छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून राष्ट्र उभारणीचे कार्य आपण सगळे करूया असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य श्री हनुमंत ठाकरे यांनी केले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा शेवट राष्ट्र वंदनेने करण्यात आला .

veer nayak

Google Ad