ग्रामजयंती निमित्त गुरुकुंजात सामूहिक ग्रामगीता पठण व मार्गदर्शन ज्ञानयज्ञास सुरुवात

0
45
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा ११६ वा जन्मोत्सव अर्थात ग्रामजयंती महोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे राष्ट्रसंताच्या महासमाधीसमोर सामुहिक ग्रामगीता पठण व मार्गदर्शन ज्ञानयज्ञास दिनांक १७ मार्च पासून सुरुवात झाली असून एकूण ४१ दिवस हा उपक्रम नियमितपणे चालू राहणार आहे. २७ एप्रिल २०२५ रोजी या सामुहिक ग्रामगीता पठणाची सांगता होणार असून या कार्यक्रमास श्रीमती सुधाताई जवंजाळ आजीवन प्रचारक, एडवोकेट शितलताई पंकजराव भोयर वर्धा, श्री भानुदासजी कराळे श्री गुरुदेव सेवाश्रम अकोला,सौ. अनुराधाताई राऊत (दळवी) नागपूर यांचे प्रमुख उपस्थिती लाभणार असून मार्गदर्शक म्हणून ग्रामगीताचार्य सौ. वृषालीताई धर्मपूरीवार चंद्रपूर व ग्रामगीताचार्य डॉ. प्रीतीताई राऊत तेल्हारा जिल्हा अकोला या उपस्थित राहतील.

वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संपूर्ण ग्रंथ संपदेमध्ये अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा ग्रामगीता हा ग्रंथ असून या ग्रंथामध्ये मनुष्याच्या जन्माच्याही पूर्वीपासून तर मृत्यूनंतरचे क्रियाकर्म अशा प्रकारे संपूर्ण जीवन प्रवासावर राष्ट्रसंतांनी प्रकाश टाकला असून या जीवसृष्टीवरील असा कुठलाही विषय ग्रामगीतेमधून सुटला नाही. सदर ग्रामगीतेमध्ये ४१ अध्यायाचा समावेश असून क्रमाक्रमाने रोज एका अद्यायाचे सायंकाळी सामुदायिक प्रार्थनेनंतर सामूहिक पठण होते व त्यावर एका तज्ञ महिलेचे मार्गदर्शन केल्या जाते अशा प्रकारचा हा उपक्रम असून गुरुकुंज मोझरी व पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने माता भगिनी या उपक्रमास उपस्थिती दर्शवितात. या उपक्रमाची सांगता झाल्यानंतर लगेच २८ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत भजन, कीर्तन, प्रवचन, सत्संग, सामुदायिक ध्यान, प्रार्थना, रामधून, ग्रामसफाई,गोपाल काला, महाप्रसाद अशा प्रकारचे विविध विधायक कार्यक्रमांचे आयोजन महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले असून समस्त भावीक भक्तांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण दळवी व सचिव श्री उद्धवराव वानखेडे यांनी केले आहे.

veer nayak

Google Ad