वेशभूषा व नंदी सजावट करून आणणाऱ्यावर विविध आकर्षक बक्षीसांचा वर्षाव
आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : दि. २३/०७/२०२५ रोजी डॉ. ठोंबरे यांच्या दवाखान्यासमोर नेताजी वार्ड आर्वी येथे पंकज गोडबोले मित्र परिवारातर्फे तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पोळ्यामध्ये आर्वी शहरातील विविध भागातून या ठिकाणी वेशभूषा व नंदी सजावट करून आलेल्या बालगोपालांना पाहण्या करिता मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. यामध्ये काही शंकरजी, राधाकृष्ण, शेतकरी, बनून हिंदू संस्कृती टिकून राहावी याकरिता या बालगोपालांच्या माध्यमातून समाजाला एक प्रेरणादायी संदेश दिला. तर या पोळ्यामध्ये २०० हून अधिक मुलांनी वेशभूषा व नंदी सजावट करून सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकरराव अमृतकर, नारायणराव भुसारी, राजूभाऊ थोरात, किशोरराव हिंगलासपुरे, तसेच परीक्षक सौ. ज्योतीताई हिंगलासपुरे, सौ. साधनाताई अजमीरे यांच्या उपस्थितीत शंकरजीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. परीक्षकांनी सर्व सजावटीचे परीक्षण करून बक्षीस काढण्यात आले. तसेच यामध्ये
प्रथम बक्षीस रोख १५०१/- रू. डॉ. ठोंबरे व जवाहर मेडिकल आर्वी यांच्यातर्फे *प्रथमेश, प्रियांश डाफे* यांना देण्यात आले. तर द्वितीय बक्षीस १००१/- रू. यश शिरपुरे फोटोग्राफी यांच्यातर्फे *दिव्यांशी घायवट* यांना देण्यात आले. तर
तृतीय बक्षीस ५०१/- रू. श्री नितीन वाघधरे यांच्यातर्फे *ध्रृव वैभव लाेडे* यांना देण्यात आले. हा सर्व देखावा पाहण्याकरिता मोठ्या संख्येने नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन निलेश अमृतकर यांनी केले व प्रास्ताविक सौ. ज्योतीताई हिंगलासपुरे तर आभार पंकज गोडबोले यांनी मानले.
सर्व बालगोपालांना प्रोत्साहनपर रोख बक्षीस व शालेय उपयोगी वस्तू भेट देण्यात आले.
अनिल भाऊ पांडे यांच्यातर्फे १०००/- रू. प्रत्येकी १० स्पर्धकांना १००/- रू. रुपये देण्यात आले. तर
ज्ञानेश्वरराव आसाेले यांच्यातर्फे ५००/- रू. प्रत्येकी ५ स्पर्धकांना १००/- रू. रुपये देण्यात आले तर
स्टुडन्ट अकॅडमी यांच्यातर्फे ५००/- रू. प्रत्येकी ५ स्पर्धकांना १००/- रू. रुपये देण्यात आले.
तर मनोज आगरकर यांच्यातर्फे ३००/- प्रत्येकी ३ स्पर्धकांना १००/- रू. रुपये देण्यात आले.
तसेच सर्व वेशभूषा व नंदी सजावट स्पर्धक बालगोपालांना जवळेकर हॉस्पिटल साईनगर, आर्वी व लक्ष्मी स्टुडिओ तर्फे प्रोत्साहनपर वस्तू भेट व अतुल बॅग सेंटर तर्फे पेन सेट तर जयेश गोडबोले यांच्याकडून कॅडबरी चॉकलेट देण्यात आले.
पोळ्याचे आयोजन पंकज गोडबोले मित्रपरिवार व तसेच रोशन उराडे, गुड्डू उराडे, निलेश अमृतकर, अमित भुसारी, अनिल लांडगे, गुणवंत गुल्हाने, यश शिरपुरे, हर्षल पवार, जीवन श्रीराव, जीवन उराडे, कीर्ती पांडे, अमोल डवरे यांनी या कार्यक्रमाकरिता अथक परिश्रम घेतले.