घरकुल योजनांसाठी व्हॉट्सॲप क्रमांक सुरु

0
32
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती, दि. 18 : घरकुल योजनांची प्रभावी आणि जलद अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने ७७६९९३७३३६ हा व्हॉट्सॲप क्रमांक जारी केला आहे. लाभार्थ्यांना घरकुलाचे हप्ते वेळेवर मिळाले नसल्यास जिओ टॅग फोटोवर आपले नाव, गाव आणि पंचायत समितीचे नाव नमूद करून या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

“सर्वांसाठी घरे” हे शासनाचे महत्वाचे धोरण आहे. याच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि अमरावती जिल्हा परिषद यांच्यातर्फे विविध ग्रामीण गृहनिर्माण योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना -ग्रामीण, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान, रमाई आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, मोदी आवास घरकुल योजना आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य योजनांचा समावेश आहे

veer nayak

Google Ad