आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : त्रिशरण बुद्ध विहार भीमसैनी अशोकराव कुंभारे परिसर स्टेशन वार्ड देऊरवाडा रोड आर्वी या परिसरात भगवान बिरसामुंडा चा भव्य पुतडा उभारणार आहे या साठी आदर्श एकता सामाजिक संघटनेचे अध्यक्ष गौतम अशोकराव कुंभारे स्व खर्चाने पुतडा उभारणार आहे.भगवान बिरसा मुंडा नी निःस्वार्थ आयुष पणाला लावून ” जल, जमीन, जंगल, ये अधिकार अपने है’ हे सांगत लोकांन मध्ये जागृती निर्माण केली.त्याची परतफेड म्हणून किव्हा त्यांची कीर्ती लोकांपर्यंत पोहचवावी करिता भगवान बिरसा मुंडाच्या पुतड्याचे भूमिपूजन संजय कळणे याच्या हस्ते शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पारपडले.या भूमी पूजनच्या कार्यक्रम प्रामुख्यानी उपस्थित दशरत जाधव,सूर्यप्रकाश भटड,विजय वाघमारे,नानू राठोड हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन आदर्श एकता सामाजिक संघटनेच्या महिलांनी केले.या वेळी उपस्थित शोभा टेकाम,जया सरोदे, सुलोचना कुंभारे,डोंगरे काकू,पूजा कोडापे,मेघा सरोदे, छोटी कर्नाके, वानखडे काका,विजय कुंभारे,राजू डोंगरे राकेश वर्टी,मंगेश सरोदे,विजय दहीत,श्याम गोंडेलवार,विजय भावराव,नितीन टेकाम,राजेश कोडापे श्रीपाल वानखडे,मोरेश्वर सातपुते मैबूब शेख,शोभीत कुंभारे दिवेश कुंभारे बंटी माहुरे तनु सरोदे इत्यादी कार्यकारणी उपस्थित हिते.या कार्यक्रमाचे आभार शुभांगी गौतम कुंभारे यांनी मानले.














