अमरावती – महानगर पालिका चे कार्यक्षेत्रात असलेले खानावळ , हॉटेल , लॉजिंग , दूध डेअरी , किराणा दुकान ,ब्युटी पार्लर, बार रेस्टॉरंट , व खाद्य पदार्थ तयार करून विक्रेता यांचे दुकान , व आस्थापना यांना व्यवसाय करण्यासाठी त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचारी यांची आरोग्य विषयक तपासणी करून व्यवसाय च्या ठीकानाची व दुकानाची सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी मार्फत पाहणी केल्या नंतर विहित नुमण्या मध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग महानगर पालिका दुसरा माळा पंजाबराव बँकेच्या बाजूला राजकमल चौक येथे अर्ज सादर करून आपल्या आस्थापना चे आरोग्य विषयक ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात यावे.
सदर अर्ज अमरावती महानगर पालिकेच्या वेब साईट वर सुध्या उपलब्ध असून साथ रोग – नागरिकांच्या आरोग्य साठी संबंधित खाद्य पदार्थ बनवणारे व विक्रेते अमरावती कार्यक्षेत्रात व्यवसाय करणाऱ्यांनी व्यवसायकानी घेण्यात यावे असे जाहीर आवाहन डॉ विशाल काळे आरोग्य अधिकारी महानगर पालिका यांनी केले आहे