उत्सव तीन रंगांचा
आभाळी आज सजला
नतमस्तक त्या सर्वांसाठी
ज्यांनी भारत देश घडवीला..
भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरवात केली तो दिवस म्हणजे 26 जानेवारी…. भारतीय संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी झाली आणि भारत एक प्रजासत्ताक देश बनला आणि म्हणूनच आपण हा दिवस देशाचा ” प्रजासत्ताक दिन ” म्हणून साजरा करतो…
धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित से.फ.ला.हायस्कूल धामणगाव- रेल्वे जिल्हा-अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी 26 जानेवारी ” प्रजासत्ताक दिन ” निमीत्त विद्यालयाच्या दर्शनी फलकावर रेखाटन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत ..