धामणगाव रेल्वे
श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शिक्षण द्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर कब्स मध्ये पदवी दान समारंभाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी समीर हिरुळकर , इंग्रजी शिक्षक, से फ ला हायस्कूल, धामणगाव रेल्वे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये के .जी.१च्या विद्यार्थ्यांनी स्किट व नृत्य सादर केले तसेच के .जी .२ च्या विध्यार्थ्यानी काउन्ट ऑन मी हे सुंदर गीत सादर केले.
त्यानंतर के .जी .२ च्या विद्द्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका के .साई नीरजा पर्यवेक्षिका शबाना खान व कार्यक्रमाचे मुख्य अतिथी समीर हिरुळकर यांनी पदवी देऊन सन्मानित केले .के.जी .२ च्या काही विद्यार्थिनी आपले विचार भाषणातुन व्यक्त केले त्यानंतर या मुलांचा नर्सरी ते के .जी. २ पर्यंतचा शालेय प्रवास व सुंदर आठवणी व्हिडिओ द्वारे दाखवण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रणिता जोशी व रेणुका सबाने यांनी केले तसेच आभार प्रदर्शन प्राजक्ता दारुंडे यांनी केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका के .साई नीरजा व पर्यवेक्षिका शबाना खान यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रणिता जोशी , रेणुका सबाने, वर्षा देशमुख , आकांक्षा महल्ले, राणी रावेकर , वृषाली काळे , हर्षदा ठाकरे , प्राजक्ता दारुंडे यांनी तसेच प्रायमरी स्कूल स्टाफ संगीत शिक्षक गौरव देवघरे ,नृत्य शिक्षक सचिन उईके, संगणक प्रशिक्षक धीरज चाफले , यश राऊत , कला शिक्षक अतुल मांडवकर, व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.