दिनांक :- २/०३/२०२६
एस ओ एस कब्समध्ये रंगोत्सव होळी मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये एकता, बंधुभाव, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण करणे हा होता. सण साजरा करताना सुरक्षितता, स्वच्छता आणि नैसर्गिक साधनांचा वापर करण्याचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रि.प्रायमरी हेड माननीय शबाना खान यांनी होळीच्या महत्त्वा विषयी माहिती देऊन करण्यात आली. होळी हा अधर्मावर धर्माचा विजय दर्शविणारा सण आहे. या दिवशी भक्त प्रह्लाद यांच्या भक्तीचा आणि दृष्ट होलिका यांच्या पराभवाचा स्मरण म्हणून होळिका दहन केले जाते. या प्रसंगातून सत्य, श्रद्धा आणि सद्गुण यांचा विजय होतो, हा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
शिक्षिका विशाखा मेंढे यांनी होळी हा एक महत्त्वाचा सण आहे जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. त्यांनी स्पष्ट केले की होलिका दहनाच्या दिवशी लोक होळी पेटवून आपल्या मनातील नकारात्मक विचारांचा त्याग करतात आणि रंगपंचमीच्या दिवशी रंगांच्या माध्यमातून वसंत ऋतूचे स्वागत करतात.
कार्यक्रमामध्ये प्रतीकात्मक होळिका दहन करून विद्यार्थ्यांनी त्यांची एक वाईट सवय लिहून प्रतिकात्म होलिकेच्या अग्नीत जाळून टाकली. तसेच सवयी, मत्सर, राग यांचा त्याग करण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. त्यानंतर विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंगांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. रासायनिक रंगांमुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेता, सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांना फक्त नैसर्गिक रंग लावून व फुलांनी पर्यावरणपूरक होळी साजरी केली.
विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी वेशभूषेत नृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. आनंदी वातावरणात गाण्यांवर ठेका धरत सर्वांनी सणाचा मनमुराद आनंद लुटला. शेवटी सर्वांना गोड पदार्थांचे वितरण करण्यात आले.

अशा प्रकारे शाळेत होळी उत्सव आनंद, उत्साह आणि सामाजिक जाणीवेचा संदेश देत यशस्वीरित्या पार पडला. प्रि. प्रायमरी हेड माननीय शबाना खान यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षिका प्रणिता जोशी, रेणुका सबाणे, वर्षा देशमुख, आकांक्षा महल्ले, विशाखा मेंढे, अश्विनी नांदने, स्नेहल दुर्गे, ऋचा अडवलकर यांनी सहकार्य केले.














