धामणगाव रेल्वे :
धामणगाव रेल्वे – राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार वार्ड क्रमांक 3 चे संदेश कुचेरिया यांच्या प्रचार दौऱ्याला स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त आणि भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रभागातील घराघरांत होत असलेले उत्साहपूर्ण स्वागत, युवकांचा टाळ्यांच्या गजरातला सहभाग आणि महिलांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती यामुळे कुचेरिया यांचा प्रचार वेगाने पुढे जात आहे.

प्रचार दौऱ्यात संदेश कुचेरिया यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासाच्या गरजा जाणून घेतल्या. “जनतेचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. वार्डचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण सारे एकदिलाने पुढे जाऊ,” असे कुचेरिया यांनी सांगितले.

स्थानिक नागरिकांमध्येही सकारात्मक वातावरण पाहायला मिळत असून, “वार्डच्या प्रगतीसाठी संदेश कुचेरिया हेच योग्य उमेदवार आहेत,” अशी भावना मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत आहे.













