बारा किलोमीटरचा रोड बनवायला बारा वर्ष लागतील का ?
संघर्ष समिती व राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष होत असून लक्ष देत नसल्याची शहरात चर्चा
आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : सात ते आठ वर्षांपासून सुरू असलेले बारा किलोमीटरचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. राजकीय लोकांचे दुर्लक्ष होत होते म्हणून आर्वी शहरात एक वर्षापूर्वी आर्वी तळेगाव रोड हा चांगला झाला पाहिजे याकरिता ज्या विश्वासाने संघर्ष समिती स्थापन करण्यात आली होती. त्यावरून असं वाटत होतं आता हा बारा किलोमीटरचा रोड महिन्याभरात पूर्णत्वास येईल परंतु असं न होता तब्बल एक वर्ष लोटून ही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. एक वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुका जवळ येताच तळेगाव ते बुलढाणा गोडाऊन पर्यंत रोडचं काम सपाट्याने झाले परंतु बुलढाणा गोडाऊन पासून ते मॉडेल हायस्कूल पर्यंत नॅशनल हायवे रोडचे काम आर्वी शहरातून गेलेल्या या तीन किलोमीटरच्या कामाला तीन वर्षे लागतील का? असा प्रश्न आर्वी तालुक्यातील नागरिकासमोर उपस्थित झाला आहे. आता संघर्ष समिती आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
रोडच्या मधात येत असलेले इलेक्ट्रिक पोल न काढताच संत गतीने निकृष्ट दर्जाचे टप्प्या टप्प्यात काम सुरू आहे. आणि जुनी झाडे काढून नवीन झाडे लावणे बाबत निवेदन तयार करून सात ते आठ हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या नोंदवल्या होत्या तोही मात्र झाडाचा विषय एक वर्षापासून प्रलंबित असून कोणीही बोलायला तयार नाही. नवनिर्वाचित राजकीय नेते व संघर्ष समिती काहीतरी करेल असं वाटलं होतं परंतु जनतेच कुठेही समाधान होत असल्याचे दिसून येत नाही. अखेर पाणी मुरतंय कुठं हे समजायला मार्गच नाही.
____________________
जुनी झाडे काढून नवीन झाडे लावण्याकरिता एक वर्षापूर्वी राबवले होते स्वाक्षरी अभियान
एक वर्षांपूर्वी संघर्ष समितीने आर्वी तळेगाव च्या मदात येत असलेले शंभर ते दीडशे वर्षे पूर्वीचे झाड काढून नवीन झाड लावून पर्यावरण वाचवण्याकरिता स्वाक्षरी अभियान राबवले होते पर्यावरण समिती विरुद्ध नॅशनल हायवेच्या रोडच्या मदात येत असलेले झाड काढण्या बाबत हा खटला सुरू आहे. मात्र त्यावर अजूनही काय प्रक्रिया सुरू आहे हे कोणीच सांगायला तयार नाही. संपूर्ण आर्वी शहरातील नागरिकांच्या सात ते आठ हजार स्वाक्षरी सुद्धा घेतल्या होत्या आणि ते स्वाक्षरी निवेदन जवळपास एक वर्षांपूर्वी नॅशनल हायवेच्या वकिलाजवळ दिल्याचे संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
___________________________
सात वर्षापासून रोडचे काम सुरू मात्र इलेक्ट्रिक पोल व अतिक्रमण काढण्यास दिरंगाई
अखेर सात आठ वर्षांपासून काम सुरू असून इलेक्ट्रिक पोल व अतिक्रमण काढण्यास दिरंगाई का होत आहे. तहान लागल्यावरच वीर खोदत्ता का? अगोदर इलेक्ट्रिक पोल व अतिक्रमण न काढण्याचे कारण काय मदात येत असलेले रस्त्यावरचे इलेक्ट्रिक पोल व अतिक्रमण न काढताच नॅशनल हायवे शहरातुन गेलेल्या रस्त्याचे काम सुरू केले.
ना इलेक्ट्रिक पोल काढल्या गेले ना अतिक्रमण ज्या तत्परतेने धार्मिक स्थळ हटवले त्याच तत्परतेने इलेक्ट्रिक पोल व अतिक्रमण अगोदर का हटवले नाही असा नागरिकांमध्ये चांगलेच चर्चेला पेव फुटले आहे. रोडचे काम करत असताना मदात येत असलेल्या झाड, इलेक्ट्रिक पोल व अतिक्रमणामुळे सुरळीत व चांगले काम करण्याकरिता अडचण निर्माण होत आहे.
त्यामुळे सुस्त गतीने रस्त्याचे काम सुरू आहे. अतिक्रमण धारकास राजकीय नेत्यांची साठ गाट तर नाही ना? अशी देखील आर्वी शहरात चर्चा होत आहे.
__________________________
कीटकाने पोखरलेले झाडे काढून नवीन झाडे लावा अशी होत आहे मागणी
रोडच्या मदात येत असलेले झाड हे १०० ते १५० वर्षा पूर्वीचे असल्याने बरेचसे झाड जमिनीपासून कीटकाने पोखरले असून झाड केव्हा कोणाच्या अंगावर येऊन कोसळतील काही नेम नाही रस्त्यावर येत असलेले झाड काढून पर्यावरण वाचवण्याकरिता रोडच्या बाजूला नवीन झाड लावून पर्यावरण वाचवा अशी मागणी आर्वीतील स्थानिक नागरिक करीत आहे.
________________________
प्रतिक्रिया
आर्वी – तळेगाव रोडचे काम सात ते आठ वर्षापासून सुस्त गतीने सुरू आहे. आर्वी शहरातून जात असलेल्या नॅशनल हायवेच्या रस्त्याचे काम सुरू आहे मात्र रस्त्याच्या मधात येत असलेले झाड शंभर ते दीडशे वर्षे जुनी असून ते जमिनीतून चांगलेच कीटकाने पोखरले असून केव्हा कोणाच्या अंगावर येऊन झाड कोसळल आणि कुणाचा जीव जाईल काही नेम नाही. कोणाची जीवित हानी होऊ नये या करिता प्रशासनाने दखल घेऊन पर्यावरण वाचवण्याकरिता जुनी झाडे काढून तातडीने नवीन झाडे लावावी..!
अंगत गिरधर (सामाजिक कार्यकर्ता)
—-‐—————————————-
प्रतिक्रिया
आर्वी शहरातुन गेलेला तीन किलोमीटरचा नॅशनल हायवे रोडच काम ज्या पद्धतीने होत आहे ती पद्धत चुकीची आहे. अख्ख्या महाराष्ट्रात गावा गावातून मोठ मोठे जुनी झाड काढून नवीन झाडे लावून रोड मोठे झाले. आर्वी हे तालुक्याचे ठिकाण असून सात ते आठ वर्षापासून रोडचं काम सुरू आहे. हा रोड आपल्या आर्वी शहरासाठी इतिहासातला पहिला रोड राहील की त्या रोडला आठ वर्ष पूर्ण होईल. इलेक्ट्रिक डिपार्टमेंट यंत्रणेला वेळेवर पोल काढण्याचा जाग आला तीन किलोमीटरच्या रोडचे पोल काढायला एक वर्ष लागतील का? या कामाला जबाबदार प्रशासन तर आहेच परंतु राजकीय नेते हि तेवढेच जबाबदार आहे. निवडणुका लागल्या की हात जोडून पाया लागतात. निवडून आले की गांधारीच्या भूमिकेत असल्याचे दिसतात त्यांना गावाशी प्रेम आहे की नाही असे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर आता नवनिर्वाचित आमदार खासदारांनी तरी तातडीने लक्ष देऊन रस्त्याचे काम पूर्ण करण्याकरिता प्रशासनाला ठणकावून सांगून होत असलेल्या त्रासापासून आर्वीकर नागरिकांना मुक्त करावे.!
अंकुश गोटेफोडे (सामाजिक कार्यकर्ता)
_________________________
प्रतिक्रिया
आर्वी तळेगाव रोडचं काम हे नियमबाह्य होत असून निकृष्ट दर्जाचे होत आहे. मधातल्या डांबरी रोडचा पोपडा काढून दोन्ही बाजूने तेच मटेरीयल टाकून पाणी न टाकताच धुमस करत आहे. कमी एम एमची गीटी वापरून थातूरमातूर लेवल करत आहे. मास काँग्रेट टाकून सुद्धा पाणी टाकत नसल्याचे दिसत आहे. या रोडवर कुठलाही सार्वजनिक बांधकाम विभागातील इंजिनिअरच सुपर व्हिजन नसल्याने मनमानी कारभार सुरू आहे. प्रशासन सुस्त आणि लोकप्रतिनिधी मस्त तसेच संघर्ष समिती सुद्धा गांधारीच्या भूमिकेत दिसत आहे. नक्कीच पाणी कुठेतरी मुरत असल्याचं दिसत आहे.
सुधीर जाचक (सामाजिक कार्यकर्ता)
——————————–