गडचिरोली, दि.6: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चे अनुषंगाने निवडणूक निरीक्षक (सामान्य), विनीतकुमार यांनी काल 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील विसोरा येथील मतदान केंद्र क्रमांक 101, 102, 103 व 104 तसेच देसाईगंज येथील महिला (पिंक) मतदान केंद्र क्रमांक 132 (नैनपूर वार्ड) तसेच दिव्यांग मतदान केंद्र क्रमांक 125 इत्यादी मतदान केंद्रांनी भेटी देऊन मतदान केंद्रांची पाहाणी केली व त्या ठिकाणी असलेल्या सोयी सुविधाबाबत माहिती जाणून घेतली. तसेच त्रुटींबाबत मार्गदर्शन करुन सदर त्रुटी दुर करणेबाबत निर्देश दिले.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी, 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी श्रीमती मानसी, उपविभागीय अधिकारी कुरखेडा, रणजीत यादव, निवडणूक निरीक्षक (सामान्य) यांचे संपर्क अधिकारी ए.के.बकालिया, नायब तहसिलदार, विलास तुपट, निवडणूक महसुल सहायक महेंद्र मेहर प्रामुख्याने उपस्थित होते. असे स्विप व मीडिया नोडल अधिकारी, देसाईगंज श्रीमती प्रणाली खोचरे यांनी कळविले आहे.