आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : दि. १२/०२/२०२५ रोजी आर्वी पोलीस स्टेशनला पोस्को गुन्हा दाखल. एका अल्पवयीन मुलींचे काही दिवसापूर्वी इंस्टाग्राम वरून झालेल्या ओळखीतून पीडित मुलीचे एका अल्पवयीन मुलासोबत मैत्री झाली त्याच मैत्रीतून नेरी पुनर्वसन येथील घर खाली आहे असे सांगून गुप्त सूत्रांच्या माहितीनुसार ११/०२/२०२५ रोजी पीडित अल्पवयीन मुलगी दोन मुलासोबत गाडीवर बसून नेरी पुनर्वसन आर्वी येथे गेली असता पाठीमागून आलेल्या
पाच मुलांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचे उघडकीस आले.
या गुन्ह्यातील एकूण पाच अधिक दोन असे आरोपी पीडित महिलेच्या सांगण्यावरून आर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पुढील तपास आर्वीचे ठाणेदार सतीश डेहनकर यांच्या मार्गदर्शनात पोस्को गुन्ह्यातील पुढील तपास एपीआय सुचिता मडावाले करीत आहे.