मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत पिंपळखुटा गावात विविध विकासात्मक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी

0
31
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

दिनांक : २२ डिसेंबर २०२५

राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत पिंपळखुटा (ता. धामणगाव, जि. अमरावती) येथे गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध लोकाभिमुख उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. या उपक्रमांमुळे गावातील आरोग्य,स्वच्छता, पाणीपुरवठा, पर्यावरण संवर्धन तसेच सामाजिक विकासाला चालना मिळाली आहे.

या कार्यक्रमा मध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०२५-२६ अंतर्गत ग्रामपंचायत पिंपळखुटा यांची अंतिम तपासणी करण्यात आली. पथक प्रमुख म्हणून मा. डॉ. प्रफुल्ल भोरखडे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती धामणगाव रेल्वे हे प्रामुख्याने उपस्थित होते. पथक सदस्य म्हणून श्री. निलेश वाघ, विस्तार अधिकारी ,(पंचायत) तथा ऋषिकेश परतेकी व गजानन सोमवंशी (कनिष्ठ अभियंता) ग्रा.पा.पुरवठा उपविभाग, धामणगाव रेल्वे, त्याचबरोबर अनिता डोंगरे (अंगणवाडी पर्यवेक्षिका) प्रेमकुमार आंबुलकर (गटसमन्वयक) व विशाल सुटे (समूह समन्वयक) उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायतीची परिशिष्ट-२ अनुसार आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची तपासणी तथा प्रत्यक्ष भेटी देऊन गुणांकन करण्यात आले. यावेळी सचिव कुमारी पल्लवी रंगारी गावातील सरपंच दिलीप राऊत उपसरपंच पद्माताई मेश्राम तथा इतर पदाधिकारी, तथा इतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. तपासणी वेळी गावातील सर्व गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. बचत गट, युवक मंडळ व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

अभियानाअंतर्गत गावात गुरे-ढोरे पाणी पिण्यासाठी हौद उभारण्यात आला, त्यामुळे पशुधनाच्या पाणीपुरवठ्याची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच गावात दिशादर्शक फलक बसविण्यात आल्याने गावात ये-जा करणाऱ्या नागरिकांना व पाहुण्यांना योग्य मार्गदर्शन मिळणार आहे.

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वनराई बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले. यामुळे पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून जंगली प्राण्यांना याचा लाभ होणार आहे.

याच कार्यक्रमात पंतप्रधान आवास (घरकुल) योजना अंतर्गत लाभार्थ्यांना नव्या घरांचा गृहप्रवेश देण्यात आला. पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसून आले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामुळे पिंपळखुटा गाव विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून लोकसहभागातून गाव समृद्ध करण्याचा संकल्प ग्रामपंचायतीच्या वतीने यावेळी व्यक्त करण्यात आला.

veer nayak

Google Ad