आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : जुन्या नगरपरिषद जवळ इंदिरा चौक परिसर येथे नगरपरिषद हद्दीतील नगरपरिषदेने उभे केलेले नवीन भारताचा नवीन स्मार्ट शौचालय असे जवळपास ३ ते ४ महिने होऊन पूर्ण झाले आहे. परंतु पूर्ण होऊन सुद्धा शौचालय हे फक्त शोभेचे ठिकाण झाल्याचे दिसत आहे. हे शौचालय इंदिरा चौक व मार्केटमधल्या नागरिकांन करिता सोयीनुसार बांधले परंतु अजूनही ते घुले करण्यात आले नाही. कदाचित एखाद्या राजकीय नेत्यांच्या हस्ते त्या शौचालयाच उद्घाटन करण्याचे ठरविले असेल. त्यांना वेळ नसेल अशी चर्चा इंदिरा चौक परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे. शौचालय खुले न केल्यामुळे त्या परिसरामध्ये जागो जागी खुले शौचालय घर तयार झाले आहे. ज्या रस्त्याच्या बाजूला शौचालय आहे ताे रस्ता इंदिरा चौकातून मुख्य नेहरू मार्केटमध्ये जात असल्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना खुले असलेल्या शौचालयाच्या लोटा वरून व तिथे होत असलेल्या गंधगीतून जाने-येन कराव लागत आहे. व त्या परिसरातील आजूबाजूच्या दुकानदारांना तिथे होत असलेल्या गंदगीचा सामना करावा लागत आहे. तिथे असलेल्या परिसरातील शौचालयाला लागून असलेल्या दुकानदारांच आरोग्य धोक्यात असल्याने तरीसुद्धा नगरपरिषद व प्रशासनाला जाग नाही.
—————-
प्रतिक्रिया
माझे याच शौचालय समोर दुकान आहे हे नगरपरिषदेने बांधलेले शौचालय बंद असल्यामुळे जे जागोजागी शौचालय तयार झाले त्याचा लोट माझ्या दुकानापर्यंत येत असतो व त्याचा त्रास मला सहन करावा लागतो माझा त्रास मलाच माहित या त्रासापाई माझ आरोग्य नक्कीच धोक्यात येईल यात तिळ मात्र शंका नाही.
विजय डावरे (व्यावसायिक)
——————————————–
प्रतिक्रिया
माझा कारखाना याच शौचालय समोर आहे हे शौचालय केंवा सुरू होणार काय माहित मला होत असलेला त्रास केंवा कमी होणार याची मी आतुरतेने वाट पाहत आहे. हे शौचालय ३ ते ४ महिन्यापासून तयार आहे या शौचालयच उद्घाटन करण्याकरिता नगरपरिषद कदाचित राजकीय नेत्यांची वाट तर पाहत असेल..?
ईमतीयाज अन्सारी (व्यावसायिक)
———————————————
आम्हाला लघु शंका लागल्यास आम्ही कुठे जाणार?
प्रतिक्रिया
आम्हाला लघुशंका लागल्यास आम्ही काय करणार शौचालय बनवून ३ ते ४ महिन्यापासून तयार आहे. नाईलाजाने आम्हाला बाहेरच कुठेतरी हलकं कराव लागते माणसाची जात कुठेही हलकं करून घेईल पण महिला शौचालयास कुठे जाणार हा मोठा प्रश्न आहे. नगरपरिषदेने बनवून ठेवलेले शौचालय हे लवकर सुरू केले तर शासनाने केलेल्या खर्चाच कुठेतरी चीत होईल व सर्व नागरिकांची सोय होईल..!
प्रदीप आगासे (सामान्य नागरिक)
————————————–
प्रतिक्रिया
नगरपरिषद व्यापारी व नागरिकांकडून टॅक्स घेत असलेल्याने शौचालय बनवणे व लवकर सुरू करणे हे नगर परिषदेची जबाबदारी आहे. टॅक्स म्हणजे हा जनतेचा पैसा आहे. हे थेट जनतेच्या पैशातून बनवलेले शौचालय आहे. शौचालय बनवून जर सुरू होत नसेल तर प्रशासनाच्या अलगर्जीपणामुळे टॅक्स भरत असलेल्या नागरिकांच्या पैशाचा दुरुपयोग आहे. असे म्हणायला काही हरकत नाही. शौचालय बनून तीन-चार महिने हाेत आहे तर प्रशासन काय करत आहे याकडे प्रशासन व नगरपरिषदेने तातडीने लक्ष देऊन हे शौचालय जनतेच्या सोयीसाठी बनवले आहे तर लवकरात लवकर सुरू करावे…!
सुधीर जाचक (सामाजिक कार्यकर्ता)