नांदगाव खंडेश्वर/
गोळेगाव जगतपुर रस्त्याच्या पुलाचे काम दोन वर्षांपासून प्रलंबित आहे विविध घटनेत वर्षभरात चार पारधी समाजाच्या बालकांचे आतापर्यंत मृत्यू झाला असून आज दुपारच्या दरम्यान जगतपुर येथील रोनक दिगाबर पवार वय ६ वर्षे आपल्या आई सह रोनक झोपी गेला असतांना त्याची आई रजनी पवार पाण्यासाठी बाहेर गेली असता रोनक उठून सदर अर्धवट पुलाच्या बांधकामा जवळ गेला
तिथे मोठ मोठे खड्डे खोदून ठेवली आहेत त्यात पाणी साचले असतांना रोनक त्यात पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला त्यामुळे पारधी समाजाने शासना विरुद्ध रोष व्यक्त करून शवविच्छेदन करण्यास नकार दिला व ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनि गदारोळ केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता पोलिसांच्या मध्यस्थीने व सदर घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी तिथे समजूत काढून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला यावेळी पारधी समाजाचे मतींन भोसले उपस्थित होते
———————————
मुख्यमंत्र्यांनी ग्राम सडक योजने अंतर्गत गोळेगाव जगतपुर रस्त्यावरील पुलाचे बांधकाम दोन वर्षेपासून रखडले आहे त्यामुळे निष्पाप पारधी समाजाच्या बालकाला जीव गमवावा लागला तात्काळ पुलाचे काम सुरू करण्यात यावे व संबंधितावर गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्याची मागणी यावेळी शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी केली