ड्रोनचे प्रशिक्षण विविध क्षेत्रात उपयुक्त ठरणार -जिल्हाधिकारी सौरभ कटियार. भातुकली येथे किसान ड्रोनचे प्रात्यक्षिक

0
23
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती, दि. 23 (जिमाका) : जिल्हा कौशल्य व उद्योजकता विभागातर्फे ड्रोन हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. युवकांना या माध्यमातून रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. सध्या शासनही विविध कामांसाठी ड्रोनचा उपयोग करीत असल्याले ड्रोन हाताळण्याचे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे, असे मत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी व्यक्त केले.

भातकुली येथे स्वराज फाऊंडेशनच्या वतीने ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कौशल्य विकासच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, तहसिलदार अजितकुमार येळे, तालुका कृषी अधिकारी श्रीमती भोसले, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी श्रीमती बोरेकर आदी उपस्थित होते.

श्री. कटियार यांनी, किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय सर्वसाधारण योजनेतून प्रशिक्षणाच्या योजनेसाठी एक कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. यातून जिल्ह्याभरात 10 प्रशिक्षण संस्था कौशल्य प्रशिक्षण राबवित आहे. यामध्ये 27 प्रशिक्षण तुकड्यातून 810 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत, महिला ड्रोन प्रशिक्षण घेणार असल्याने त्यांचे सक्षमीकरणही होणार आहे. शेतीमध्ये ड्रोनच्या उपयोगाबाबत ग्रामीण भागात शंका आहे, त्यामुळे त्यांच्या शंकांचे निरासन हे ड्रोनची उपयोगिता सिद्ध करून दाखवावे लागणार आहे.

गेल्या काळात स्वामित्व योजनेत गावातील मालमत्तांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी ड्रोनचा उपयोग करण्यात आला. पोलिस, रेल्वे, वीज पुरवठा आदी क्षेत्रात ड्रोनचा सक्षमपणे उपयोग करण्यात येत आहे. सर्व घटकांसाठी मोफत असलेले प्रशिक्षण घेऊन युवकांनी कृषि विभागातर्फे असलेल्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी योवळी केले.

भातकुली तालुक्यामध्ये स्वराज एज्युकेशन सेंटर संस्थेतर्फै ॲग्रीकल्चर सेक्टरमध्ये उपयुक्त किसान ड्रोन ऑपरेटर अभ्यासक्रमासाठी 90 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहे. यात 52 महिलांचा सहभाग आहे. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींना सदर योजनेंतर्गत मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. सुरवातीला किसान ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ड्रोनच्या जनजागृतीबाबत पथपाट्य सादर केले.

सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी प्रास्ताविक केले. प्रशिक्षणार्थी जयश्री खडसे यांनी मनोगत व्यक्त केले. संप्रदा डाखरे यांनी सूत्रसंचालन केले. धनंजय डाखरे यांनी आभार मानले.

veer nayak

Google Ad