कावली वसाड परिसरामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

0
56
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण जगभर मोठ्या उत्साहामध्ये साजरी होते त्याचाच एक भाग म्हणून धामणगाव रेल्वे तालुक्यातील कावली वसाड परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली.
वसाड येथे नवयुवक पंचशील मंडळातर्फे यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थ हेंडवे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध गझलकार प्रा. गुलाब मेश्राम, मायाताई हेंबाडे, उपसरपंच गवई ताई, पोलीस पाटील ज्योती साव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर लहान विद्यार्थ्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.

यावेळी बोलताना गुलाब मेश्राम म्हणाले की बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन चरित्र सांगत बसले तर दिवस सुद्धा अपुरा पडतो परंतु त्यांनी एकट्या समाजासाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी काम केले म्हणून ते बोधिसत्व झाले.
अध्यक्षीय भाषणात सिद्धार्थ हेडवे यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये बाबासाहेबांचा खरा मित्र जर कोणी असेल तर ते पुस्तक होते म्हणून त्यांनी ग्रंथासोबत मैत्री केली आणि त्यामुळेच या देशाच्या संविधानामध्ये समता स्वातंत्र्य व बंधुत्व हा विचार त्यांनी त्यामध्ये टाकला म्हणून बाबासाहेब डोक्यावर घेणे नाचण्यापेक्षा बाबासाहेबांना वाचले पाहिजे वाचाल तर वाचाल वाचन करणे हे काळाची गरज आहे तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना आदरांजली ठरेल म्हणून प्रत्येकाने वाचन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी आव्हान केले.
यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन गवई यांनी केले संचालन गौरव मनवर यांनी तर आभार नितीन टाले यांनी मानले.
ग्रामपंचायत कावली येथे सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व सरपंच उपसरपंच सचिव तसेच सर्व सदस्य उपस्थित होते.
दाभाडा येथे सुद्धा जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली संपूर्ण गावांमधून रॅली काढून एक एकात्मतेचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून त्यांनी दिला.

veer nayak

Google Ad