डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महाप्रज्ञासूर्याने अंधारात चाचपडणाऱ्या माणसाला “ज्ञानप्रकाश” दिला.. प्रा. अक्षय नवघरे. से.फ.ला. विद्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

0
28
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे – तालुका प्रतिनिधी 

धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक 14 एप्रिल विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे तसेच प्रमुख अतिथी विद्यालयाचे उपप्राचार्य गोपाल मुंधडा, पर्यवेक्षक प्रा.प्रदीप मानकर व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते से.फ.ला. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. अक्षय नवघरे हे व्यासपीठावर उपस्थित होते..

 या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.अक्षय नवघरे यांनी आपल्या अभिभाषणात आपण खर्च करून कितीही मोठी जयंती साजरी केली तरीही गरीबाच्या झोपडीतून ज्ञानाचा दिवा पेटवून एखादं लहान लेकरू हातात पुस्तक घेऊन परिवर्तनाच्या वाटेवर चालू लागेल ना..तेव्हाच खरी जयंती साजरी केल्यासारखी होईल. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ बोलते सुधारक नाही तर कर्ते सुधारक होते. कायद्याचे कवच असल्यावरच स्त्रियांना हक्क मिळतील हा केवढा मोठा दृष्टिकोन त्यांचा होता.. डॉ. बाबासाहेबांच्या चरित्रातून शिकून घेण्यासारखी सर्वात प्रेरणादायी बाब म्हणजे शिक्षणासाठी चाललेली प्रचंड तळमळ… कारण त्यांना माहीत होते शिक्षणाची ताकद काय आहे,मुक्यालाही सुद्धा वाचा फोडू शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाप्रज्ञासूर्याने अंधारात चाचपडणाऱ्या माणसाला ज्ञानप्रकाश दिला.दलित उपेक्षित माणसाला माणूसपण मिळवून दिले आणि त्यांच्या अंगात दहा हत्तीचे बळ आणून त्यांना ताठ उभे राहण्यास प्रोत्साहित केले.. अशाप्रकारे डॉ.बाबासाहेबांच्या कित्येक जीवन प्रसंगावर त्यांनी प्रकाश टाकला.

 

 विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.. या जयंतीच्या निमित्ताने आपण स्वतः आयुष्यात पुस्तक वाचण्याची गोडी निर्माण करावी. असे सुचविले..

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यालयाचे शिक्षक राम बावस्कर यांनी केले. या भीम जयंती उत्सव निमित्ताने विद्यालयाचे कला शिक्षक अजय जिरापुरे यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर विश्वनायक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिचित्र रंगीत खडूच्या माध्यमातून रेखाटन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. भीम जयंती कार्यक्रमाला विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते..

 दिनांक- 14 एप्रिल 2024 

 रविवार

veer nayak

Google Ad