शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका; अन्यथा तहसीलवर धडकणार ‘जनआक्रोश’  मा.आ. वीरेंद्र जगताप यांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा

0
73
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

“एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी होरपळला आहे, तर दुसरीकडे सरकारी यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे त्याला आपला माल मातीमोल भावाने विकण्याची वेळ आली आहे. नाफेडची खरेदी बारदान्याअभावी बंद ठेवणे हा शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे. प्रशासनाने जर दोन दिवसांत सुधारणा केली नाही, तर आम्ही लोकशाही मार्गाने ईंट का जवाब पत्थर से देऊ,” अशा शब्दांत माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.

नाफेड केंद्रावर बारदाणा उपलब्ध नसल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून तूर आणि चणा खरेदी ठप्प आहे. या प्रश्नावर आज माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली आणि संताप व्यक्त केला.

प्रशासकीय दिरंगाईवर ओढले ताशेरे:

निवेदन देताना माजी आमदार जगताप यांनी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा पाढाच वाचला. ते म्हणाले की, खरेदी सुरू होऊन महिना उलटत नाही तोच बारदाणा संपतो, हे सरकारचे अपयश आहे की व्यापाऱ्यांशी असलेले साटलोटं? केंद्र बंद असल्याचा फायदा घेऊन खासगी व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत आहेत. शेतकऱ्यांच्या घाम गाळून पिकवलेल्या मालाला ‘कवडीमोल’ भाव मिळत असताना प्रशासन मूग गिळून का बसले आहे? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

निवेदनातील आक्रमक मागण्या:

१. युद्धपातळीवर बारदाणा पुरवठा: पुढील ४८ तासांच्या आत खरेदी केंद्रावर पुरेसा बारदाणा उपलब्ध झालाच पाहिजे.

२. व्यापाऱ्यांची नफेखोरी थांबवा: नाफेड बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना खासगी बाजारात होणारा तोटा भरून काढण्यासाठी तात्काळ खरेदी सुरू करा.

३. थेट कारवाईचा इशारा: जर दोन दिवसांत वजनकाटे सुरू झाले नाहीत, तर कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल.

‘आता चर्चा नाही, तर थेट संघर्ष’

आमदार वीरेंद्र जगताप यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांनी आतापर्यंत शांततेने वाट पाहिली आहे, पण आता त्यांच्या संयमाचा बांध फुटला आहे. “प्रशासनाने आमच्या निवेदनाला केवळ कागदाचा तुकडा समजू नये. जर शेतकऱ्यांचा माल खरेदी केला गेला नाही, तर चांदूर रेल्वे तालुक्यात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल. होणाऱ्या सर्व परिणामांना प्रशासन जबाबदार असेल,” असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी “शेतकरी एकजुटीचा विजय असो”, “आमच्या हक्काचा बारदाणा मिळालाच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. या आंदोलनात परिसरातील शेकडो शेतकरी, पदाधिकारी श्री गोविंदराव देशमुख, परीक्षित जगताप, पंकजराव शिंदे, गणेश भाऊ आरेकर, अमोल होले, श्रीनिवास सूर्यवंशी, नितीन गोंडाने, शिट्टू दादा सूर्यवंशी, नितीन कोपरकर, अशोकराव चौधरी, प्रवीण चीचे, पवन चौधरी, दिनेश ठाकरे, संजय डुकरे, सुरेंद्र नेरकर, सतीश धरम केले, गजानन गोरडे, प्रेमदास रामटेके, सुधीर नलगे, हरिभाऊ ठाकरे, देवानंद खुणे, रुपेश पुरके भीमराव पवार, रावसाहेब शेळके, अनिस भाई सौदागर, प्रफुल कोकाटे, शामरावजी शिरसाम, अनिल फरकाडे, वैभव चुके कार, सारंग देशमुख, प्रतीक भैसे, राहुल राऊत, गोपाल अविनाशे, राजाभाऊ शेळके, अनंत पोलाद, सनी सावंत, अजय होटे, सुधीर फरकाडे, किसनराव इंगोले, अनिल फरकाडे, पवन ठवरे, शाम भाऊ बेलसरे,

veer nayak

Google Ad