डॉक्टर एम.के .पवार शैक्षणिक संकुलामध्ये शिवजयंती उत्साह संपन्न.

0
94
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव … स्थानिक जुना धामणगाव येथे शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर एम के पवार शैक्षणिक संकुल मध्ये शिवजयंती निमित्ताने वीर शिवबा वस्तीगृहात सकाळी ध्वजारोहण करण्यात आले . कार्यक्रमाला संस्थेचे सचिव शिवाजीराव पवार, समन्वयक प्राध्यापिका जया केने, प्राचार्य मोहम्मद उज्जैनवाला, उप प्राचार्य दीप्ती हांडे उपस्थित होते .छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हर अर्पण करून सोबतच स्वर्गीय प्रमिलाताई पवार संस्थेच्या मातोश्री यांचे पुण्यस्मरण असल्याने त्यांच्या प्रतिमेला हार अर्पण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले .

छत्रपती शिवाजी महाराजांचा गीत गाऊन वानखडे सर सर्व त्यांची संच यांनी सादर केले. शिवनेरीवर शिवबा जन्मला या गीतावर शिवाजी महाराजांच्या जन्मापासूनचा देखावा सादरीकरण यामध्ये यामध्ये काजल मून यांनी राजमाता जिजाऊ यांची भूमिका साकारली होती तर बाल शिवबाची भूमिका सागर बोदुलवार या विद्यार्थ्याने साकारलेली होती नयन रम्य देखाव्याने प्रेक्षकांचे डोळे पाणवले त्यामध्ये राजमातांचे वासल्य राजमातांनी बालपणी शिवाजी महाराजांवर केलेले संस्कार याचे चित्रीकरण करण्यात आलेले होते. स्नेहश्री ,वंश व्यवहारे, प्रथम खाडे, मयूर काकडे, अंशुमन काकडे, महेश मते, श्रेयांस राठोड , क्रिश शिंदे ,दर्शन बनसोड या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या चरित्रावर भाषणे केली सोबतच शाळेतील शिक्षक महेश धांदे ,हनुमंत ठाकरे,संजय मसराम,अक्षय बोंद्रे यांनी शिवचरित्रावर सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थ्यांमध्ये शिवगर्जना करण्यात आली त्यामध्ये मेहुल शेंडे ,परिधी देशमुख , प्रसाद जुनघरे, महेश धांदे अक्षय बोंदरे यांनी केली. यावेळी विद्यार्थिनींनी शिवाजी महाराजांवर गाणी , नृत्य सादर केले त्यामध्ये ऋतुराज धुर्वे व क्रिश लोखंडे सागर व्यवहारे आनंद वैद्य , प्रियांशु बिस्मोरे, आरोही देवकर ,निधी ,आराध्या गाडेकर, संध्या जांभेकर, जानवी पटोरकर, कीर्ती अधिकार, किशोरी धांडे या विद्यार्थ्यांनी झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा गाण्यावर सुंदर असे नृत्य केले. अंशुमन चौधरी यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर पोवाडा सादर केला. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या मातोश्री स्वर्गीय प्रमिलाताई पवार यांना वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजन मरणा हक का बहाना है/ जिना उधार लाना है /हे भजन गाऊन श्रद्धांजली देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना तापडिया व हनुमंत ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन मंजुषा विलायत कर यांनी केले. या कार्यक्रमाला संकुलातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला विशेष सहकार्य अंकुश डुकरे गोकुळ काळे, संजय मसराम ,पूजा सोळंके यांचे लाभले. कार्यक्रम शेवट पसायदान करून झाला.

veer nayak

Google Ad