चांदुर रेल्वे : आमदार प्रताप दादा अडसड यांच्या नेतृत्वाखाली स्वाती शैलेंद्रजी मेटे यांच्या प्रचारार्थ प्रभागनिहाय जनसंवाद रॅली

0
33
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदुर रेल्वे – नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. स्वाती शैलेंद्रजी मेटे यांच्या प्रचाराला गती मिळाली असून आमदार प्रताप दादा अडसड यांच्या नेतृत्वाखाली प्रभागनिहाय जनसंवाद रॅली आयोजित करण्यात आली.

रॅलीदरम्यान विविध प्रभागांमध्ये नागरिकांनी आमदार प्रताप दादा व उमेदवार स्वाती मेटे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. महिलांचा सहभाग, तरुणांचा जोश आणि नागरिकांचा ओघ यामुळे रॅलीला विशेष प्रतिसाद मिळाला.

या भेटीगाठींमध्ये नागरिकांनी स्थानिक समस्या, अपेक्षा आणि विकासाच्या गरजा मांडल्या. यावेळी आमदार प्रताप दादा अडसड म्हणाले, “चांदुर रेल्वेच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध असून स्वाती ताईंच्या नेतृत्वाखाली दर्जेदार कामे राबवली जातील.”

सौ. स्वाती शैलेंद्रजी मेटे यांनी नागरिकांच्या प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले की, “शहराचा विकास, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांवर प्राधान्य देत आम्ही चांदुर रेल्वेचा चेहरा बदलू.”

रॅलीमुळे भाजपाच्या प्रचार मोहिमेला आणखी उभारी मिळाली असून शहरात निवडणुकीचे वातावरण अधिक रंगतदार बनले आहे.

veer nayak

Google Ad