नोंदणी न झालेल्या मतदारांनी नोंदणी करावी – जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

0
20
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती, दि. 30लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदारांनी उत्साहात मतदान करुन मतदानाची टक्केवारी वाढवली. परंतु काही मतदार संघामध्ये मतदारांचे नाव मतदान यादीमधून गहाळ किंवा सापडत नसल्याचे तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुषंगाने ज्या मतदारांचे नांवे सापडत नसेल किंवा गहाळ झालेली असेल अशा मतदारांनी मतदार यादीमध्ये समाविष्ट करणेकरीता फार्म क्र. 6 भरुन संबंधित बीएलओ, तहसिलदार कार्यालय किंवा ऑनलाईनव्दारे नोंदणी करुन मतदार यादी समाविष्ट करुन घ्यावे. मतदार नोंदणी प्रक्रिया निरंतर सुरु असून त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

अमरावती लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदानाच्या दिवशी काही मतदान केंद्रावर मतदारांचे नाव गहाळ झाल्याबाबत काही वृत्तपत्रामध्ये बातम्या प्रसिध्द झाले. भारत निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणे, दुबार, मयत, स्थलांतरीत करणे व दुरुस्तीकरीता दि. 1 जुन 2023 पासुन जिल्ह्यामध्ये कार्यक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्याकरीता फार्म क्र. 6 भरुन घेणे, मयत झालेले, कायम स्वरूपी स्थलांतरीत झालेले मतदार यांचेकरीता फार्म नं.7 भरुन घेण्यात आले. तसेच स्थानांतरणाकरीता फार्म नं. 8 भरुन घेण्याची प्रक्रिया दि. 16 ऑक्टोंबर 2023 पर्यंत राबविण्यात येऊन दि. 27 ऑक्टोंबर 2023 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीनंतर मतदार यादी तपासुन मतदार यादीमध्ये नांव असल्याबाबत किंवा मतदार यादीमध्ये नांव सापडत नसेल, किंवा गहाळ झालेले अशा मतदारांना दि. 17 ऑक्टोंबर 2023 ते 12 जानेवारी 2024 या चार महिण्याच्या कालावधीत आक्षेप नोंदविणे, दावे व हरकती दाखल करण्याकरीता अवधी देण्यात आले. या कालावधीत ज्या व्यक्तीनी आक्षेप नोंदविले, अशांना नोटीस देवून त्यांचे आक्षेप निकाली काढण्यात आले. मतदार नोंदणी कार्यक्रमाबाबत विविध माध्यमाव्दारे प्रसिद्धी देऊन जनजागृती करण्यात आले. तसेच वेळोवेळी राजकीय पक्षांचे प्रतिनिधीसोबत बैठका घेऊन मतदार नोंदणीबाबत आवाहन करण्यात आले. त्यानंतर दि. 23 जानेवारी 2024 रोजी अंतीम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आले. मतदार यादी प्रसिद्धी झाल्यानंतर सुद्धा नामनिर्देशन पत्र स्विकारण्याच्या अंतिम तारखेच्या 10 दिवस अगोदरपर्यंत मतदार यादीतुन नांवे वगळणे, नाव समाविष्ट करणे, नांव स्थानांतरीत करण्याची प्रक्रिया सुरुच होती. नामनिर्देश दाखल करण्याच्या अंतिम दिवशी दि. 4 एप्रिल 2024 रोजी यादी मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली.

भारत निवडणूक आयोगाचे कार्यक्रमानुसार 07-अमरावती सार्वत्रिक लोकसभेची निवडणूक दि. 26 एप्रिल रोजी शांततेत पार पडली. या निवडणूकीमध्ये अमरावती मतदार संघातील 18 लक्ष 36 हजार 078 मतदार मतदानाकरीता पात्र होते. या निवडणूकीकरीता एकुण 1 हजार 983 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. याकरीता 1 केंद्राध्यक्ष व 3 मतदान अधिकारी असे एकुण 7 हजार 932 कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रावर नेमणूक करण्यात आली. तसेच 10 टक्के पथकाकरीता 793 कर्मचारी राखीव ठेवण्यात आले, असे एकुण 8 हजार 725 कर्मचाऱ्यांची नेमणूक निवडणुकीसाठी करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीमध्ये आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होवू नये. तसेच मतदारांना प्रलोभन देण्यात येवून मतदारांना मतदानाकरीता प्रवृत्त करण्यात येवू नये, या करीता जिल्हास्तरावर एसएसटीचे 21, व्हीएसटी 23, एफएसटी 56 असे एकुण 100 पथके तयार करण्यात आली. या पथकांनी आपली कामगीरी चोख बजावून जिल्ह्यामध्ये कुठेही अनुचित प्रकार निर्देशनात आले नाही.

दिव्यांग व 85 वर्षावरील मतदारांसाठी गृह मतदानाची सुविधा प्रथमच देण्यात आली. ही मोहिम दि. 12 ते 14 एप्रिल 2024 या कालावधीत करण्यात आली. यामध्ये 1 हजार 104 व अत्यावश्यक सेवा मतदार सात असे एकूण 1 हजार 111 मतदारांने मतदानाचा हक्क बजावला. तसेच जे कर्मचारी निवडणूक ड्युटीवर कार्यरत आहे अशा कर्मचाऱ्यासाठी ईडीसीकरीता पोस्टल बँलेट मार्फत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. दि. 26 एप्रिल 2024 रोजी पात्र मतदारापैकी 11 लक्ष 69 हजार 121 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून 63.67 टक्के मतदानाची नोंद केली. मागील 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये 11 लक्ष 07 हजार 063 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मागील 2019 मध्ये झालेल्या मतदानापेक्षा 62 हजार 058 मतदारांनी या निवडणूकीत जास्त मतदान करुन मतदानाची टक्केवारीत झाली, अशी माहिती उप जिल्हा निवडणुक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली.

veer nayak

Google Ad